तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:31 PM2020-09-07T21:31:18+5:302020-09-07T21:32:48+5:30
State Bank Of India: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे.
स्टेंट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मोठी भरती काढणार असून पुढील तीन महिन्यांत 14000 जागा भरल्या जाण्याची शक्यत आहे. एसबीआय (SBI) ने आजच 30000 जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ही भरती केली जाणार आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या २.४९ लाख इतकी होती. त्यातील ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरी बसावं लागू शकतं. व्हीआरएससाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३० हजारांमध्ये ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याआधी २००१ मध्ये एसबीआयनं व्हीआरएस योजना आणली होती.
यामुळे या कर्मचाऱ्यांच्य़ा रिक्त जागांवर हे ताज्या दमाचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. 'ऑन टॅप व्हीआरएस' ही योजना स्टेट बँकेत लागू होण्याची शक्यता आहे. एसबीआयही कर्मचारी फ्रेंडली आणि विस्तार करणार असल्याने पुढील काळात १४००० जागांवर भरती केली जाणार आहे, असे स्टेट बँकेतील सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
There've been reports about 'On Tap VRS' scheme proposed to be introduced by SBI. It's been interpreted as cost-cutting measure. SBI is employee-friendly & expanding its operations evidenced by the fact that Bank has plans of recruiting over 14,000 employees this year: SBI Spox pic.twitter.com/0Q01YnkEon
— ANI (@ANI) September 7, 2020
एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्च २०२० रोजी २.४९ लाख इतकी आहे. हाच आकडा मार्च २०१९ मध्ये २.५७ लाख इतका होता. खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या...
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा
निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना
दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली
Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी
Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव
Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर
"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार