बाबरी, गुजरातचा बदला घेण्यास येऊ - 'इसिस'ची धमकी

By admin | Published: May 21, 2016 10:18 AM2016-05-21T10:18:02+5:302016-05-21T11:28:20+5:30

बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मिर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी हातात तलवार घेऊन आम्ही भारतात येऊ' अशी धमकी 'इसिस'तर्फे देण्यात आली आहे.

To get revenge for Babri, Gujarat - threat of 'Isis' | बाबरी, गुजरातचा बदला घेण्यास येऊ - 'इसिस'ची धमकी

बाबरी, गुजरातचा बदला घेण्यास येऊ - 'इसिस'ची धमकी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२१ - 'बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मिर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी हातात तलवार घेऊन आम्ही भारतात येऊ' अशी धमकी 'इसिस' (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने एका व्हिडीओमार्फत दिली आहे. दोन वर्षांपूर्वी 'इसिस'मध्ये सामील होण्यासाठी भारतातून सीरियात गेलेल्या फवाद शेख या दहशतवाद्याचा चेहरा व्हिडीओ स्पष्ट दिसत असून त्याने भारताला धमकी दिली आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार,  'इसिस'तर्फे अरेबिक भाषेतील २२ मिनिटांचा हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये भारतातून इसिसमध्ये सहभागी झालेल्या काही जिहादी तरूणांचे चेहरे दिसत असून ठाण्यातील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असणारा फवाद शेखचाही त्यात समावेश आहे. इराक व सीरियामध्ये हिंसाचार करणा-या काही जिहादींची मुलाखत या व्हिडीओत दाखवण्यात आली असून त्यातूनच भारतात घातपात करण्याची धमकी दिली आहे. 
( इसिस भारतात हल्ले करण्याच्या तयारीत)
 
कोण आहे हा फवाद शेख? 
२०१४ साली कल्याणमधील चार तरूण 'इसिस'मध्ये सहभागी होण्यासाठी धार्मिक यात्रेच्या नावाखाली देशातून बाहेर पडले व तिथूनच पुढे सीरियामध्ये गेले होते.  त्यापैकीच एक असलेल्या इंजिनीअरिंगचा विद्यार्थी फवाद शेख आता इसिसमधील एक दहशतवादी बनला आहे. मात्र या व्हिडीओत त्याने आपली ओळख अबु अम्र अल हिंदी अशी करून दिली असून त्याने भारत आणि दक्षिण आशियातील देशांना धमकी दिली आहे. तसेच त्याने त्याच्यासोबत सीरियात आलेल्या कल्याणमधील आणखी एक सहकारी शाहिम टंकी याला श्रद्धांजलीही वाहिली आहे. रक्का येथील बॉम्ब हल्ल्यात टंकीचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी ओळखले आहे. 
 
'आम्ही लवकरच परत येऊ. पण, आमच्या हातात तलवार असेल. बाबरी मशीदीचा सूड घेण्यासाठी आणि काश्मीर, गोध्रा व मुझफ्फरनगरमधील मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही येऊ. भारतातील हे हल्ले स्थानिक जिहादींकडूनच इसिस घडवून आणेल' असे शेखने या व्हिडीओत म्हटले आहे. दरम्यान इसिसच्या या व्हिडीओत शेखसह इतर काही दहशतवाद्यांनीही धमकीवजा संदेश दिले आहेत.
तसेच ' इस्लाम स्वीकारा, अन्यथा जीझिया कर भरा आणि तेही जमणार नसेल तर मरण्यास तयार व्हा अशी धमकीही या व्हिडीओतून देण्यात आली आहे. 
दरम्यान कल्याणमधून गेलेल्या चार तरूणांपैकी एक असलेला आरीब माजिद भारतात परतला असून तो सध्या एनआयएच्या कोठडीत चौकशीस सामोरा जात आहे. 
 
 
 
 
 
 
 

 

Web Title: To get revenge for Babri, Gujarat - threat of 'Isis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.