लवकर बरे व्हाल... डॉ. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी PM मोदींची प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:44 PM2021-10-14T13:44:32+5:302021-10-14T13:49:09+5:30
मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते.
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधानमनमोहन सिंग (Manmohan Singh) यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदींनीही ट्विट करुन ते लवकर बरे होवोत, यासाठी प्रार्थना केली आहे.
मनमोहन सिंग यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून ते छातीत श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार करत होते. त्यांना ताप आल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे तातडीने त्यांना एम्सच्या केसी.एन टॉवरमध्ये भरती करण्यात आले आहे. मनमोहन सिंगांवर उपचारासाठी लगेचच एम्सने एक मेडिकल टीम तयार केली असून या एम्स टीमचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया नेतृत्व करत आहेत.
मनमोहनसिंग यांच्या रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त समजताच देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रार्थना करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन, डॉ. सिंग यांची तब्येत लवकरच ठणठणीत होवो, ही प्रार्थना केली आहे. तर, माज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ट्विट करुन मनमोहनसिंग यांच्या प्रकृती स्वास्थतेसाठी
I pray for the good health and speedy recovery of Dr. Manmohan Singh Ji.
— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2021
मी आणि संपूर्ण कुटुंब माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत, देशभरातून डॉ. साहेबांसाठी प्रार्थना करण्यात येत आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
The nation is collectively praying for the good health of our former Prime Minister Dr Manmohan Singh Ji. I along with my family wish Dr Sahab a speedy recovery and best of health.
— Prithviraj Chavan (@prithvrj) October 14, 2021
दरम्यान, मनमोहन सिंगांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यांना 19 एप्रिलला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना 29 एप्रिलला सोडण्यात आले होते. आता पाच महिन्यांनी त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे.