योग करा तणाव मुक्त व्हा - पंतप्रधान मोदी

By Admin | Published: June 21, 2015 08:21 AM2015-06-21T08:21:52+5:302015-06-21T10:31:56+5:30

तणावामुक्त होण्यासाठी योग महत्त्वाचा असून यामुळे जगभरात शांतता व नवीन उर्जा निर्माण करण्याची एक संधी मिळाली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Get Yoga Tension Free - Prime Minister Modi | योग करा तणाव मुक्त व्हा - पंतप्रधान मोदी

योग करा तणाव मुक्त व्हा - पंतप्रधान मोदी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - तणावामुक्त होण्यासाठी योग महत्त्वाचा असून यामुळे जगभरात शांतता व नवीन उर्जा निर्माण करण्याची एक संधी मिळाली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. योगव्दारे शरीर, आत्मा, मन या सर्वांवर संतुलन मिळवता येते असेही त्यांनी म्हटले आहे. 

भारतासह जगभरात आज २१ जूनरोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त दिल्लीतील राजपथवर योग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह सुमारे ३५ हजार नागरिक उपस्थित होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी योगाचे महत्त्व सांगत योग करुन निरोगी राहण्याचा सल्ला दिला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाला पाठिंबा देणा-या संयुक्त राष्ट्र संघाचे व अन्य देशांचे जाहीर आभार मानले.दिल्लीतील राजपथ हा योगपथ होईल असा विचारही कोणीही केला नव्हता असेही त्यांनी नमूद केले. शरीरात लवचिकता आणून त्याला विविध आकार देणे म्हणजे योग नाही, अन्यथा सर्कशीतील सर्वच जण योगी झाले असते असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आबालवृद्धांपासून सर्वच वयोगटातील नागरिक उपस्थित होते. 

संबोधित केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांमध्ये बसून योग केेला. ३५ हजार नागरिकांनी ३५ मिनीटांमध्ये २१ योग प्रकार केले. कार्यक्रम संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांना बघून चिमुकल्यांनीही त्यांना गराडा घातला. मोदींभोवती गर्दी वाढल्यानंतर एसपीजीच्या जवांनाना मोदींना गर्दीतून बाहेर काढले. दिल्लीसह देशाच्या विविध राज्यात योग दिनानिमित्त योगशिबीरांचे आयोजन करण्यात आले. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे भरपावसातही योगदिनाचा उत्साह होता. तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत योगत्सोवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जगभरात १५० हून अधिक देशांमध्ये आज योग दिन साजरा केला जाणार असून मलेशिया, तैवान येथे योग दिन साजरा करण्यात आला. तर संयुक्त राष्ट्रातही योगदिवस साजरा केला जाणार आहे. 

Web Title: Get Yoga Tension Free - Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.