पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हाच मुद्दा

By admin | Published: September 8, 2015 03:19 AM2015-09-08T03:19:01+5:302015-09-08T03:19:01+5:30

पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर(पाकव्याप्त काश्मीर) बेकायदेशीर कब्जा केला आहे तो परत मिळविणे हाच एकमेव मुद्दा असल्याचा इशारा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री

Getting Pakwat Kashmir is the only issue | पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हाच मुद्दा

पाकव्याप्त काश्मीर मिळविणे हाच मुद्दा

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या ज्या भागावर(पाकव्याप्त काश्मीर) बेकायदेशीर कब्जा केला आहे तो परत मिळविणे हाच एकमेव मुद्दा असल्याचा इशारा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंग यांनी सोमवारी दिला. काश्मीर हा कधीही न संपणारा अजेंडा असल्याचे विधान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. राहील शरीफ यांनी केले होते.
जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्म भाग होता आणि राहील, असे जितेंद्रसिंग यांनी स्पष्ट केले. भारतासाठी जम्मू-काश्मीर किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणता मुद्दा असेल तर तो पाकव्याप्त काश्मीरचा पुन्हा भारतात समावेश करणे हाच असेल, असे ते म्हणाले. पाकव्याप्त काश्मीर हा जम्मू-काश्मीरचा भाग असूनही पाकिस्तानने त्यावर गेल्या ६५-६६ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या कब्जा केला आहे, असे त्यांनी येथे पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हटले. भारताने दु:साहस केल्यास भारताचे झेपणार नाही असे नुकसान होईल, असा इशारा राहील शरीफ यांनी रविवारी दिला होता.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

युद्ध लादल्यास भारताची अपरिमित हानी - शरीफ
इस्लामाबाद : ‘काश्मीर’चा ‘न संपलेला विषय’ असा उल्लेख करत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी छोटे किंवा मोठे युद्ध लादल्यास भारताला अपिरिमित हानी सोसावी लागेल, अशी धमकी दिली.
पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर सतत आगळीक सुरू असताना त्याचे प्रमुख युद्ध झाल्यास भारताची खैर नसल्याच्या वल्गना करत असल्यामुळे स्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. १९६५ मधील भारतासोबतच्या युद्धाला ५० वर्षे झाल्यानिमित्त रावळपिंडी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात रविवारी बोलताना शरीफ यांनी ही धमकी दिली. त्यांनी भारताचे नाव घेतले नाही.

Web Title: Getting Pakwat Kashmir is the only issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.