गाझियाबादच्या मास्क, PPE किट बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग; 14 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:56 AM2021-03-12T07:56:19+5:302021-03-12T07:56:42+5:30
Fire in PPE kit company: आगीत जखमी झालेल्यांपैकी 5 जणांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणि 8 लोकांना यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या फॅक्टरीमध्ये मास्क आणि पीपीई किट बनविण्यात येते.
गाझियाबादच्या एका फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली आहे. महत्वाचे म्हणजे ही आग मास्क आणि पीपीई किट बनवत असलेल्या कंपनीला लागली आहे. यामध्ये 14 जण जखमी झाले आहेत. (fire broke out at PPE kit company.)
लिंकरोडच्या इंडस्ट्रीयल एरियामधील 12/71 फॅक्टरीमध्ये ही आग लागली आहे. फॅक्टरीमध्ये आग लागण्याची सूचना मिळताच फायर बिग्रेडच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. साहिबाबाद आणि वैशाली फायर स्टेशनच्या गाड्या पोहोचल्या आहेत. मोठ्या प्रयत्नांनंतर फायर बिग्रेडच्या टीमने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या आगीत 14 जण जखमी आहेत.
आगीत जखमी झालेल्यांपैकी 5 जणांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणि 8 लोकांना यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या फॅक्टरीमध्ये मास्क आणि पीपीई किट बनविण्यात येते. एसएसपी कलानिधि नैथानी यांनी सांगितले की, मेडिकल इक्विपमेंट बनविणाऱ्या फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली आहे. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीत दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलासह 14 लोक जखमी झाले आहे. यामध्ये 4 लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे.
कंपनीमध्ये असलेल्या केमिकलच्या ड्रमचाही स्फोट झाला आहे. यामुळे इमारतीचा काही भाग तुटला आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही.