दे दणादण! पाव किलोमध्ये 4 टोमॅटो पाहून महिलेचा चढला पारा; भाजी विक्रेत्याला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 04:15 PM2023-08-05T16:15:27+5:302023-08-05T16:16:39+5:30

250 ग्रॅममध्ये 4 टोमॅटो पाहून महिलेने भाजी विक्रेत्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. टोमॅटोच्या दरावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

ghaziabad four tomatoes came in 250 grams customer assaulted shopkeeper | दे दणादण! पाव किलोमध्ये 4 टोमॅटो पाहून महिलेचा चढला पारा; भाजी विक्रेत्याला केली मारहाण

दे दणादण! पाव किलोमध्ये 4 टोमॅटो पाहून महिलेचा चढला पारा; भाजी विक्रेत्याला केली मारहाण

googlenewsNext

देशातील टोमॅटोच्या दरामुळे लोकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. यामुळे लोकांचं बजेटही बिघडलं आहे. याच दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे टोमॅटोच्या वाढत्या किमतीवरून एका महिलेचं भाजी विक्रेत्याशी भांडण झाले. दरावरून तिने आपल्या साथीदारासह भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हे प्रकरण गाझियाबादच्या थाना क्रॉसिंग रिपब्लिकशी संबंधित आहे. येथे एक महिला टोमॅटो घेण्यासाठी आली होती. तिने 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो टोमॅटो घेतले. पण 250 ग्रॅममध्ये 4 टोमॅटो पाहून महिलेने भाजी विक्रेत्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. टोमॅटोच्या दरावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर महिला तेथून निघून गेली.

काही वेळाने ती महिला एका पुरुषासोबत परतली आणि दुकानदाराशी भांडू लागली. याला प्रत्युत्तर म्हणून टोमॅटो विक्रेत्याच्या साथीदारानेही महिलेसोबत आलेल्या तरुणाशी हुज्जत घातली. वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी जोरदार हाणामारी झाली. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. महिला ग्राहक आणि भाजी विक्रेता या दोघांनाही समजावलं आहे. जर कोणी तक्रार दिली तर कारवाई केली जाईल. या घटनेची जोरदार चर्चा रंगली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: ghaziabad four tomatoes came in 250 grams customer assaulted shopkeeper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.