प्रेमासाठी वाटेल ते! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या नावावर केला आकाशातील तारा, जाणून घ्या, कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 02:08 PM2023-10-07T14:08:55+5:302023-10-07T14:17:18+5:30
गाझियाबादमधील एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही भन्नाट केलंय जे समजताच सर्वच जण हैराण झाले आहेत.
प्रेमात लोक एकमेकांसाठी काहीही करतात. आतापर्यंत तुम्ही बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला गुलाबाचं फुल, टेडी किंवा सुंदर ड्रेस गिफ्ट दिल्याचं पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण आता गाझियाबादमधील एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडसाठी असं काही भन्नाट केलंय जे समजताच सर्वच जण हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील एका बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड श्रियाच्या नावावर चक्क एक तारा केला आहे. आकाशातील एका ताऱ्यावर श्रियाच्या नावाची रजिस्ट्री केली. आकाशातील हा लुकलुकणारा तारा आता त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावाने ओळखला जाणार आहे.
गाझियाबादमध्ये एक फोटो जोरदार व्हायरल होत आहे. तारा डेटाबेस रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा हा फोटो आहे. ज्यावर स्टार डेटाबेस नंबर लिहिलेला असतो. ज्या व्यक्तीच्या नावावर ही रजिस्ट्री झाली आहे तिचे नाव श्रिया आहे. या सर्टिफिकेटमध्ये अंतराळातील स्थानानुसार ताऱ्याची सध्याची उपस्थिती देखील नमूद केली आहे.
इतकंच नाही तर हा तारा कोणत्यातरी तारा प्रणालीमध्ये असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सर्टिफिकेटचानुसार, हा तारा NGC328 फिनिक्स नक्षत्रात आहे. फिनिक्स नक्षत्र हे अंतराळात असलेले एक लहान नक्षत्र आहे. त्याचे बरेचसे तारे खूप धूसर आहेत आणि त्यात फक्त दोन अतिशय तेजस्वी तारे आहेत. या नक्षत्राचा शोध डच खगोलशास्त्रज्ञ पेट्रस प्लेकियस यांनी लावला होता.
सोशल मीडियावर अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या चंद्रावर रजिस्ट्री करण्याचा दावा करतात. काही वेबसाइट्स आणि काही खासगी अवकाश संशोधन संस्था आहेत ज्या ताऱ्यांवर माणसांच्या नावांची रजिस्ट्री करतात. तारांवर रजिस्ट्री करणं ही खूप लांब आणि खर्चिक प्रक्रिया आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.