गुड बाय लाईफ! तरुणाने इन्स्टावर पोस्ट केली अन् घरापासून 35 किमी अंतरावर घडलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 01:32 PM2022-12-02T13:32:01+5:302022-12-02T13:35:18+5:30

घरातून दुकानात जातो असं सांगून तो बाहेर पडला होता मग तो गोल्फ लिंक्सच्या आशियाना सोसायटीत कसा पोहोचला, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे.

ghaziabad polytechnic student wrote on instagram post 12 hours before his death good bye life | गुड बाय लाईफ! तरुणाने इन्स्टावर पोस्ट केली अन् घरापासून 35 किमी अंतरावर घडलं असं काही...

फोटो - अमर उजाला

googlenewsNext

गाझियाबादमधील आशियाना सोसायटी, NH-9 येथे मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पॉलिटेक्निकचा विद्यार्थी वरदन शर्मा (18) याचा 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. त्याला पडताना कोणी पाहिले नाही. मृत्यूच्या 12 तास आधी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये गुड बाय लाईफ असं लिहिलं होतं. पोलीस या प्रकरणाकडे आत्महत्या म्हणून पाहत असले तरी नातेवाईकांनी हत्येची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. 

घरातून दुकानात जातो असं सांगून तो बाहेर पडला होता मग तो गोल्फ लिंक्सच्या आशियाना सोसायटीत कसा पोहोचला, असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. घरापासून 35 किमी दूर असलेल्या या सोसायटीमध्ये त्याचं कोणी ओळखीचं देखील नाही. आर्य नगर, हापूर येथील रहिवासी असलेले त्याचे वडील सुनील शर्मा यांनी कवी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हे प्रकरण हत्येचे वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच सखोल तपास केल्यास सत्य बाहेर येईल, असे सांगितले.

सुनील शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मंगळवारी गढ रोडवरील त्याच्या ऑप्टिकलच्या दुकानात बसला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो घरी जात असल्याचे सांगून दुकानातून बाहेर पडला, मात्र तो घरी पोहोचला नाही. रात्री 9.30 च्या सुमारास गाझियाबादच्या आशियाना सोसायटीत वरदानसोबत झालेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून मिळाली.

सोसायटीच्या परिसरात वरदानचा कोणीही नातेवाईक किंवा मित्र नाही. मग तो तिथे का गेला आणि कसा पडला. तो हायटेक इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. वरदानला सोसायटीत प्रवेश कसा मिळाला, असा सवाल सुनील शर्मा यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक सोसायटीत गेटवरच विचारपूस केल्यावर कुणाला आत जाऊ दिले जाते? त्याला कोणी फोन केला का? पोलीस तपासात सर्व काही स्पष्ट होईल. तो चौदाव्या मजल्यावर कसा पोहोचला? याचीही चौकशी व्हायला हवी असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिल आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ghaziabad polytechnic student wrote on instagram post 12 hours before his death good bye life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.