तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:42 PM2021-09-28T12:42:12+5:302021-09-28T12:49:00+5:30

१६ वर्षांनी त्याचं पार्थिव शरीर सापडलं. जे आज गाजियाबादला नेण्यात येत आहे. इथे जवानाच्या घरी नातेवाईक जमले आहेत. 

Ghaziabad soldier body retrieved after 16 years Indian Army | तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर

तिरंगा फडकावून परतणाऱ्या जवानांसोबत झाली होती दुर्घटना, १६ वर्षानंतर सापडलं बर्फात दबलेलं पार्थिव शरीर

Next

तब्बल १६ वर्षांनी भारतीय सेनेतील एका जवानाचा मृतदेह बर्फात दबलेला आढळून आला. २३ सप्टेंबर २००५ ला खोल जिगजेग खाडीत पडल्याने अमरीश त्यागी बर्फात दबले होते. १६ वर्षांनी त्याचं पार्थिव शरीर सापडलं. जे आज गाजियाबादला नेण्यात येत आहे. इथे जवानाच्या घरी नातेवाईक जमले आहेत. 

गिर्यारोहक सैनिकाचं पार्थिव शरीर १६ वर्षानंतर त्याच तारखेला बर्फात दबलेलं आढळून आलं ज्या तारखेला दुर्घटनेत तो बर्फाखाली दफन झाला होता. गाजियाबादच्या राहणाऱ्या अमरीश त्यागीने १९९५ मध्ये सेनेत सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांना तैनात करण्यात आलं होतं. अमरीश यांनी हिमालयाच्या सर्वात उंच टोकावर अनेकदा तिरंगा फडकवला आहे.

सप्टेंबर २००५ मध्य अमरीश त्यागी उत्तराखंडच्या हिमालयाच्या टोकावर ध्वजारोहन करून आपल्या टीमसोबत परत येत होते. तेव्हाच २३ सप्टेंबरला ते खोल दरीत पडले होते. ते त्यांच्या चार साथीदारांसोबत बर्फात दबले गेले होते. रेस्क्यू केल्यावर तीन शिपायांचे पार्थिव शरीर सापडले होते. पण अमरीशचा मृतदेह सापडला नव्हता.

बरोबर १६ वर्षांनंतर २३ सप्टेंबर २०२१ ला आर्मी कॅम्पकडून गेलेल्या एक कॉलमुळे अमरीशच्या परिवाराला धक्का बसला. कारण बातमीच तशी होती. अमरीशच्या परिवाराला आर्मीवाल्यांनी सांगितलं की, अमरीशचं पार्थिव शरीर १६ वर्षानंतर बर्फ वितळल्यामुळे त्याच ठिकाणी सापडला, ज्या ठिकाणी ती दुर्घटना घडली होती.

अमरीशच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. अखेरच्या क्षणापर्यंत ते अमरीशची आठवण काढत होते. तेच दुसरीकडे जसं अमरीश पार्थिव शरीर गावात येणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा लोक अमरीशच्या घरी येऊ लागले होते. त्यांचे नातेवाईकही आले. इथे त्याच्या पार्थिवावर राजकीय सन्मानासोबत अंत्यसंस्कार करण्यात येईल.  
 

Web Title: Ghaziabad soldier body retrieved after 16 years Indian Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.