Video - मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर पडली हायटेंशन वायर; लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 03:26 PM2024-03-11T15:26:17+5:302024-03-11T15:31:27+5:30
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हायटेंशन वायर पडल्याने भीषण आग लागली. बसमधून प्रवास करणाऱ्या ...
उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेल्या बसवर हायटेंशन वायर पडल्याने भीषण आग लागली. बसमधून प्रवास करणाऱ्या अनेकांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना मरदह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाहर धामजवळ घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच लोकांची मोठी गर्दी झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#गाजीपुर: इस वक्त की बड़ी खबर, बिजली के हाईटेंशन तार गिरने से यात्रियों से भरी बस में लगी आग, कई लोगों के मरने की खबर, CNG बस कोपागंज से बारात लेकर गाजीपुर के मरदह के महाहर आ रही थी...@ghazipurpolice@Uppolice@CMOfficeUP#Ghazipur#accidentpic.twitter.com/hm3upDKnIW
— Vikku Sachan (@vikkusachan) March 11, 2024
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बस प्रवाशांनी भरलेली होती. एका लग्नासाठी पाहुणेमंडळी जात होती. मात्र, ही बस कुठून येत होती आणि कुठे जात होती. त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, एका मुलाला वाचवण्यात यश आलं आहे. बसमध्ये बरेच लोक होते.
पल भर में मातम में तब्दील हो गईं खुशियां!#गाजीपुर में बारात ले जा रही बस पर हाईटेंशन तार गिरने से बनी आग का गोला...दो दर्जन से अधिक लोगों की दर्दनाक मौत की सूचना...भयावह हादसा देख खड़े हो गए रोंगटे!!#viralvideo#UPpic.twitter.com/5PARvVSqLi
— Himanshu Tripathi (@himansulive) March 11, 2024