Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:35 IST2025-01-31T16:14:12+5:302025-01-31T16:35:57+5:30

Ghazipur Road Accident: उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या एका भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ghazipur horrific road accident truck hits vehicle of devotees returning from mahakumbh many people died | Ghazipur Accident: भीषण अपघात! महाकुंभवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

फोटो - आजतक

UP Road Accident:उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे झालेल्या एका भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की महामार्गावर सर्वत्र रक्त पसरलं होतं.  मृतदेह विद्रूप अवस्थेत पडले होते. महाकुंभवरून येणाऱ्या प्रवाशांच्या वाहनाला एका अनियंत्रित ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरमधील नंदगंज पोलीस स्टेशन परिसरातील कुस्मी कलाजवळ हा  अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातानंतरचे दृश्य खूपच भयानक होतं. रस्त्यावर मृतदेह विखुरलेले होते. 

कुटुंबातील सदस्य रडत होते. बहुतेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. सध्या रुग्णवाहिकेतून मृतदेह रुग्णालयात नेले जात आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं की, वाराणसी-गाझीपूर-गोरखपूर  मार्गावर कुंभमेळ्यावरून परतणाऱ्या पिकअप ट्रकचा एक्सल तुटला, ज्यामुळे त्यात बसलेले लोक रस्त्यावर पडले. तेवढ्यात मागून एक ट्रक भरधाव वेगाने आला आणि या लोकांना चिरडून गेला. या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. 

Web Title: ghazipur horrific road accident truck hits vehicle of devotees returning from mahakumbh many people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.