रेशन दुकानात मिळणार तूप, दूध आणि ब्रेड; उत्तर प्रदेश सरकारने 35 दैनंदिन वस्तूंची यादी केली जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 09:04 PM2023-05-26T21:04:58+5:302023-05-26T21:05:21+5:30
दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या या यादीत 35 वस्तूंचा उल्लेख करण्यात आला असून त्यात तूप, दूध, ब्रेड, मसाले आणि गूळ यांचाही समावेश करण्यात आला आहे.
आता उत्तर प्रदेशातील रेशन दुकानांवर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूही मिळणार आहे, याबाबतची मोठी घोषणा शुक्रवारी राज्य सरकारने केली आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या या यादीत 35 वस्तूंचा उल्लेख करण्यात आला असून त्यात तूप, दूध, ब्रेड, मसाले आणि गूळ यांचाही समावेश करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही यादी पाहता आता सरकारी रेशन दुकानांचे 'सरकारी सुपर मार्केट'मध्ये रूपांतर होणार असल्याचे दिसते. रेशन दुकानांवर मुलांचे कपडे, मिठाई इत्यादी मिळणे म्हणजे दुकानात बदल होण्याचा इशारा दिसून येतो.
तज्ज्ञांच्या मते, रेशन दुकाने चालवणाऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार ही पावले उचलत आहे. या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेश सरकार भविष्यातही अशी अनेक पावले उचलू शकते. यासंदर्भात सरकार अनेक मॉडेल शॉप्सही उभारणार आहे. अशा स्थितीत ही यादी आगामी काळात आणखी मोठी होऊ शकते.
'या' वस्तूही यादीत
दूध
ब्रेड
मसाले
सौंदर्य उत्पादने
छत्र्या
टॉर्च
गूळ
तूप
खारट
काजू
गोड
दुधाची भुकटी
मुलांचे पोशाख
बीन्स
सोयाबीन
मलई
अगरबत्ती
कंगवा
काच
झाडू
पोछा
कुलूप
रेनकोट
भिंतीचे हँगर
डिटर्जंट पावडर
साबण
घड्याळ
माचिस
दोरी
बादली
मग
गाळणी
हँडवॉश
बाथरूम क्लिनर
बेबू केअर उत्पादने
दरम्यान, या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत सर्व दैनंदिन वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचा सरकारचा आणखी एक हेतू आहे. या दुकानांमध्ये कोणतीही हेराफेरी होऊ नये म्हणून दर आठवड्याला या दुकानांची तपासणी करण्याचे कामही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.