दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, "अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:47 PM2022-09-15T18:47:26+5:302022-09-15T18:47:54+5:30

दहशतवाद्यांच्या एका गटाने आझाद यांना धमकी देत पत्रात त्यांच्यावर काही आरोप केले. त्या आरोपांना त्यांनी जाहीर भाषणात उत्तर दिले.

Ghulam Nabi Azad clarification on Death Threat by Lashkar E Taiba related to Amit Shah NSA Ajit Doval Jammu and Kashmir Politics | दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, "अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात..."

दहशतवाद्यांच्या धमकीच्या पत्रावर गुलाम नबी आझाद म्हणाले, "अल्लाह शप्पथ सांगतो, मी उभ्या आयुष्यात..."

Next

Ghulam Nabi Azad, Jammu and Kashmir Politics: काँग्रेसला काही दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिलेले गुलाम नबी आझाद यांच्या विरोधात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची (Lashkar-e-Taiba) एक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (The Resistance Front) सोशल मीडियावर एक धमकीचे पत्र जारी केले. त्यात आझाद यांच्यावर काही आरोप करण्यात आले. त्या आरोपांना दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आझादांनी उत्तर दिले, "माझे नाव आझाद आहे आणि माझे विचारही आझाद आहेत. द रेझिस्टन्स फ्रंटचे आरोप अयोग्य आहेत. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल होते (Ajit Doval) किंवा गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतलेली नाही.

"अल्लाची शपथ घेऊन सांगतो..."

गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश हा अचानक झालेला नसून, एका सुनियोजित योजनेचा हा भाग आहे आणि ही योजना आधीच बनवण्यात आली होती, असे या धमकीच्या पत्रात आरोपात केले आहेत. तसेच अमित शाह यांच्याशी आझाद यांनी जम्मू काश्मीरला परतण्याआधी भेट झाली आणि त्यांच्यात एक बैठक झाली. इतकेच नव्हे तर काही विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, असेही म्हटले गेले की या बैठकीत NSA डोवाल यांनाही बोलावण्यात आले होते. या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, "मी नुकतेच ऐकले आहे की माझ्याविरोधात दहशतवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आहे. काश्मीरमध्ये येण्यापूर्वी मी अमित शहा आणि डोवाल यांची भेट घेतली असं सांगितलं जातंय पण असं काहीच घडलेलं नाही. मी माझ्या उभ्या आयुष्यात डोवाल यांना कधीही भेटलेलो नाही, मी अल्लाहची शपथ घेतो."

गुलाम नबी आझाद यांनी दहशतवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, "बंदुका हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. ज्यांनी बंदुका हाती घेतल्या आहेत, त्यांना मी आवाहन करतो की बंदुका केवळ विनाशच करतात, समस्यांवर तोडगा काढू शकत नाहीत. भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. हे गांधींचे राष्ट्र आहे. त्यामुळे जे लोक चुकीचे वागतील ते चिरडले जातील आणि पण भारताला काहीही होणार नाही", असेही ते म्हणाले.

Web Title: Ghulam Nabi Azad clarification on Death Threat by Lashkar E Taiba related to Amit Shah NSA Ajit Doval Jammu and Kashmir Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.