केंद्र सरकारचा कारभार केवळ टेलिव्हिजनच्या माध्यमातून,गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 03:24 PM2017-08-13T15:24:27+5:302017-08-13T17:22:12+5:30

केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेवर चालू आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून  चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना दिलेली सारी आश्वासने विसरुन गेलेले आहेत.

Ghulam Nabi Azad Criticizes modi government | केंद्र सरकारचा कारभार केवळ टेलिव्हिजनच्या माध्यमातून,गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल

केंद्र सरकारचा कारभार केवळ टेलिव्हिजनच्या माध्यमातून,गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल

Next

औरंगाबाद, दि.13- केंद्र सरकार जमिनीवर नाही. त्यांचा कारभार हवेवर चालू आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून  चालू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना दिलेली सारी आश्वासने विसरुन गेलेले आहेत आणि केवळ स्वत:चा एक अजेंडा राबवण्यात ते मश्गुल आहेत. त्यांच्यामुळे संघ परिवार सोडता सारेच घटक असुरक्षित असल्याचा आरोप आज येथे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रपरिषदेत केला. ते इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या उद्घाटनासाठी औरंगाबादेत आले होते.

गोरखपूर येथे आॅक्सिजनअभावी मुलांच्या मृत्युस योगी आदित्यनाथ सरकार जबाबदार आहे. त्यामुळे  योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ राजीनामा दिला  पाहिजे, अशी मागणीही आझाद यांनी यावेळी केली.त्यांनी सांगितले की, गोरखपूर हा आदित्यनाथ यांचा मतदारसंघ आहे. पण मी केंद्रीय आरोग्य मंत्री असताना १७ वेळा गोरखपूरच्या त्या हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. खराब पाण्यामुळे मृत्युचे प्रमाण खूपच वाढलेले होते. पण आम्ही अनेक उपाययोजना करुन मृत्युदर नियंत्रणात आणला. परंतु; आताआॅक्सिजनअभावी बालकांचे मृत्यु झाले आहेत. हा हॉस्पिटल प्रशासनाच्या  निष्काळजीपणाचा कळस होय. योगी सरकार याला जवाबदार आहे. म्हणून योगी आदत्यिनाथ यांनी नैतिकता स्वीकारुन राजीनामा दिला पाहिजे.

शरद पवार युपीएबरोबरच

नुकतीच दिल्लीत केंद्र सरकारविरोधी रणनिती आखण्यासाठी युपीएची बैठक झाली. त्याला युपीएचे सारे घटक पक्ष उपस्थित होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित नव्हते, त्यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात होते. याकडे लक्ष वेधता गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, मी शरद पवारांना त्यादिवशी फोनने संपर्क साधला होता. परंतु त्यांनी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळेच ते येऊ शकले नाहीत. पण ते युपीएबरोबरच आहेत.

६५ देशांना भेटी देण्याचे विसरले नाहीत

गुलाम नबी आझाद यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. निवनू येण्यापूर्वी दहा कोटी युवकांंना नोकºया देण्याचे आश्वासन ते विसरले, शेतक-यांच्या शेतीमलाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे ते विसरले. आज शेतकरी रोज आत्महत्त्या करीत आहेत. त्याकडे त्यांचे लक्ष नाही. पण पाच वेळा अमेरिकेला भेट देण्याचे आणि एकूण ६५ देशांना भेटी देण्याचे ते बरे विसरले नाहीत, असा उपहास आझाद यांनी केला.

जयराम रमेश यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे, याकडे लक्ष वेधता  आझाद म्हणाले, आमच्या पक्षात लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. योग्य मतांचा पक्षात आदर केला जातो. 

गोरक्षेच्या मुद्यावरुन सध्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले, हिंदू बांधवांना हे मान्य नाही. अनेक हिंदू बांधवांनी या घटनांचा निषेध नोंदवला आहे, 

जीएसटीमुळे देशातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एक नवी लोकशाही.....

नरेंद्र मोदी यांच्या घणाघात घालताना गुलाम  नबी आझाद यांनी सांगितले की, एक नवी लोकशाही ते रुढ करीत आहेत. दिलेली आश्वासने पाळायची नाहीत. स्वत:चाच अजेंडा वापरायचा हा त्यांचा खाक्या दिसूनत येतो. आज देशात मिडियासुध्दा सुरक्षित नाही. महिला, अल्पसंख्यक, दलित, युवक, शेतकरी कुणीही सुरक्षित नाही. फक्त नरेंद्र मोदी आणि संघ परिवार तेवढा सुरक्षित दिसतो.ही ती नवी लोकशाही होय.

पत्रपरिषदेस, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, आ. सुभाष झांबड, एम.एम. शेख, डॉ, कल्याण काळे, अरुण मुगदिया आदीची उपस्थिती होती. 

Web Title: Ghulam Nabi Azad Criticizes modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.