बराक दाम्पत्यासाठी बेंगळुरूतून भेटवस्तू
By Admin | Published: January 25, 2015 02:13 AM2015-01-25T02:13:31+5:302015-01-25T02:13:31+5:30
ओबामा दाम्पत्यासाठी कर्नाटक सरकारने भेटवस्तू पाठविल्या आहेत. त्यात म्हैसूर सिल्कची साडी, सलवार सूट व धोतराचा समावेश आहे.
बेंगळुरू : ओबामा दाम्पत्यासाठी कर्नाटक सरकारने भेटवस्तू पाठविल्या आहेत. त्यात म्हैसूर सिल्कची साडी, सलवार सूट व धोतराचा समावेश आहे. या कपड्यांवर चांदीची जर लावली आहे. याखेरीज मिशेल ओबामा यांच्यासाठी चेन्नापट्टनातील रंगीबेरंगी खेळण्यांचाही समावेश आहे. ही खेळणी तयार करणाऱ्या रहीम खान यांनी, जेव्हा ही खेळणी आपण ओबामा यांच्यासाठी खरेदी करीत आहोत असे सरकारी अधिकाऱ्यांनी ती घेताना सांगितले तेव्हा आपला आनंद गगनात मावेना अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. १७व्या शतकाच्या अखेरीस म्हैसूरचा राजा टीपू सुलतान याने इराणहून काही कलावंतांना चेन्नापट्टना येथे बोलावले. तेव्हापासूनची ही परंपरा आज मोठ्या उद्योगात रूपांतरित झाली आहे.