हृदयस्पर्शी! नातेवाईकांनी नकार देताच आईच्या पार्थिवाला लेकींनी दिला खांदा, केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 02:26 PM2023-03-14T14:26:13+5:302023-03-14T14:33:55+5:30
नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा तर दिलाच शिवाय स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कारही केले.
चार मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. आईच्या मृत्यूनंतर मुलींनी स्वतःला सावरलं पण त्यासोबतच आईच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधीही पार पाडले. सध्या या मुलींची सर्वत्र चर्चा रंगली आहे. झारखंडच्या गिरिडीहच्या सरौनमध्ये जमिनीच्या वादात नातेवाईकांनी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला. नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा तर दिलाच शिवाय स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कारही केले.
मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेल्याच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गजकुंडा पंचायतीच्या सरौनमध्ये दुखन पंडित यांची पत्नी सांझो देवी यांचा मृत्यू झाला. सांझो देवीच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि मुलींसह घरी आल्या. सांझो देवीला चार मुली होत्या, मुलगा नाही. मुलींचे लग्न झाल्यावर आणि मुलगा नसल्यामुळे जमिनीवरून वाद झाला.
सांझो यांच्या निधनानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. दुखन पंडित यांना तीन भाऊ होते. दुखन पंडित यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. दुखन पंडित यांच्या पत्नी सांझो देवी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यूची माहिती मिळताच चार मुली आल्या.
दुखन पंडित यांचा मोठा भाऊ व मधला भाऊ याने जमिनीच्या वादामुळे पार्थिव उचलण्यास नकार दिला. त्यानंतर दुखन पंडितच्या चार मुलींनी आईला खांदा दिला आणि स्मशानभूमीत नेले. त्यानंतरही नातेवाईकांनी वाद घातला आणि मारामारी केली. पण दुखन पंडित यांच्या चार मुलींनी उपस्थित राहून अंत्यसंस्कार केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"