वडिलांना किडनी देणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य हिचं गिरिराज सिंह यांनी केलं कौतुक, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 02:36 PM2022-12-06T14:36:56+5:302022-12-06T14:38:09+5:30

Giriraj Singh: लालूप्रसाद यादव यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून लालूप्रसाद यादव यांना किडनी देणाऱ्या रोहिती आचार्य यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Giriraj Singh praised Rohini Acharya, daughter of Lalu Prasad Yadav, who donated a kidney to her father, said... | वडिलांना किडनी देणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य हिचं गिरिराज सिंह यांनी केलं कौतुक, म्हणाले...

वडिलांना किडनी देणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य हिचं गिरिराज सिंह यांनी केलं कौतुक, म्हणाले...

Next

पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत आहे. लालूप्रसाद यादव यांना त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी किडनी दिली आहे. रोहिणी यांनी उचललेल्या या पावलामुळे त्यांचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावरून तिच्यावर कौतुक होत आहे. दरम्यान, लालूप्रसाद यादव यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहून रोहिती आचार्य यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

गिरिराज सिंह यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून रोहिणी आचार्य यांचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये गिरिराज सिंह यांनी लिहिले की, मुलगी असावी तर ती रोहिणी आयार्यसारखी. तुझा अभिमान आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी तुम्ही आदर्श असाल. आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आहे.

बेगूसराय येथील भाजपा खासदार असलेले केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि लालूप्रसाद यादव यांच्यातील राजकीय संबंध हे नेहमीच विरोधकाचे राहिले आहे. लालूप्रसाद यादव हे गिरिराज सिंह यांच्यावर सातत्याने टीका करत असतात. तर रोहिणी आचार्य याही गिरिराज सिंह यांच्यावर घणाघाती टीका करत असतात. मात्र लालूप्रसाद यादव आजारी असताना गिरिराज सिंह यांनी राजकीय वैर बाजूला ठेवत त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काल सिंगापूरमध्ये लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यात लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची किडनी काढून ती लालूप्रसाद यादव यांना लावण्यात आली होती. 

Web Title: Giriraj Singh praised Rohini Acharya, daughter of Lalu Prasad Yadav, who donated a kidney to her father, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.