गिरीश कर्नाड, सिम्हा यांना जीवे मारण्याची धमकी

By admin | Published: November 13, 2015 12:44 AM2015-11-13T00:44:54+5:302015-11-13T00:44:54+5:30

ज्ञानपीठ विजेते लेखक गिरीश कर्नाड आणि भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे आधीच चिघळलेल्या टिपू सुलतान यांच्या जयंतीवादाला वेगळे वळण मिळाले आहे

Girish Karnad, Sima threaten to kill them | गिरीश कर्नाड, सिम्हा यांना जीवे मारण्याची धमकी

गिरीश कर्नाड, सिम्हा यांना जीवे मारण्याची धमकी

Next

बेंगळुरू : ज्ञानपीठ विजेते लेखक गिरीश कर्नाड आणि भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे आधीच चिघळलेल्या टिपू सुलतान यांच्या जयंतीवादाला वेगळे वळण मिळाले आहे. १८ व्या शतकातील म्हैसूरचे राज्यकर्ते टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यावरून कर्नाटकच्या कोडोगू भागात हिंसाचार उफाळला आहे. गोळीबारात युवक ठार झाल्यामुळे मृत्युसंख्या दोन झाली आहे.
बेंगळुरु येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शहराचे संस्थापक केम्पे गौडा यांच्याऐवजी टिपू सुलतान यांचे नाव द्यावे, असे विधान प्रसिद्ध नाट्यलेखक, अभिनेते कर्नाड यांनी केल्यामुळे वाद उफाळला आहे. विवेकवादी लेखक एम.एम. कलबुर्गी यांच्याप्रमाणेच तुम्हाला गोळ्या घालू, अशी धमकी कर्नाड यांना टिष्ट्वटरवरून देण्यात आली. केम्पे गौडा यांच्या वोक्कालिगा समुदायातील विविध संघटना आणि भाजपने कर्नाड यांच्या विधानाला विरोध केला होता.कोडोगू येथील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर भाजपचे खासदार सिम्हा यांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यांनी लगेच म्हैसूर पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. कर्नाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांनी टिष्ट्वटरवरून धमकी देणाऱ्याचा शोध चालविला आहे.
———————————————-
टिष्ट्वटची चिंता नाही-कर्नाड
धमकी आल्यानंतर कर्नाड यांनी जराही विचलित न होता टिष्ट्वटमुळे मी चिंतित नसल्याचे स्पष्ट केले आहे. कलबुर्गी यांची हत्या भाडोत्री मारेकऱ्यांनी केली होती,असे लोक टिष्ट्वट करीत नसतात. मला धमकी देणारे भाडोत्री मारेकरी नाहीत, त्यामुळे मला चिंता करण्याचे कारण नाही. टिष्ट्वटरवरून धमकी दिली जात असेल तर त्या व्यक्तीकडे मारेकऱ्याचे गुण नाहीत, हे निश्चित, असे ते एका टीव्ही वाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाले. मी टिष्ट्वट गांभीर्याने घेतलेले नाही; मात्र सरकारच्या जबाबदारीबद्दल गंभीर आहे. ही बाब धोकादायक आहे असे मानून सरकार मला सुरक्षा प्रदान करीत असेल तर मी सहकार्य करेन, असेही ते म्हणाले.
————————————-
———————————
कर्नाड यांना जीवे मारण्याची धमकी देणे ही तर दहशत होय. आता गिरीश कर्नाड यांना धमकी... असहिष्णुता शब्द चुकीचा ठरतो. ही तर दहशत झाली.
- सीताराम येचुरी, माकपचे सरचिटणीस,(टिष्ट्वटरवर प्रतिक्रिया)

Web Title: Girish Karnad, Sima threaten to kill them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.