विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा इच्छूक स्पर्धेत गिरीश महाजन: उमेदवाराची आज घोषणा होणार; शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी सुरेशदादा जैन व गुलाबराव यांच्याशी चर्चा
By admin | Published: November 2, 2016 12:44 AM2016-11-02T00:44:16+5:302016-11-02T00:44:16+5:30
जळगाव : विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा जण स्पर्धेत आहेत. बुधवारी पक्षाकडून उमेदवाराचे नावे घोषित होईल. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
Next
ज गाव : विधान परिषदेसाठी भाजपाकडे सहा जण स्पर्धेत आहेत. बुधवारी पक्षाकडून उमेदवाराचे नावे घोषित होईल. शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. विधानपरिषदेच्या युतीसाठी प्रयत्न सुरुगिरीश महाजन म्हणाले, विधान परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, युतीच्या निर्णयाबाबत उशिर झाला. लवकर निर्णय झाला असता तर फायदा झाला असता. विधान परिषदेसाठी युती असावी यासाठी बोलणी सुरू आहे. जळगाव विधान परिषदेची जागा गेल्या दोन टर्मपासून भाजपाकडेच आहे. त्यामुळे यावेळीही उमेदवार आमचा असेल. निवडणुकीत सहकार्य मिळावे म्हणून सोमवारी शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. सहा जण स्पर्धेतविधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपातर्फे उमदेवारी मिळावी म्हणून विद्यमान आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, माजी नगरसेवक श्रीकांत खटोड, गोविंंद अग्रवाल, माजी नगरसेवक यशवंत पटेल, दिनेश जोशी हे स्पर्धेत आहेत. अमळनेरचे डॉ. रवींद्र चौधरी यांनीही भेट घेतली. मात्र याबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय घेतला जाईल. बुधवारी पक्षाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल. --------साधना महाजन उमेदवार नाहीसाधना महाजन यांच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत महाजन म्हणाले, बिनविरोध निवडून देऊ असे जर कोणी म्हणाले तरी आपल्या कुटुंबातील कोणीही या निवडणुकीसाठी उमेदवार नसेल. ------त्या वादावर बोलणे टाळलेपक्षाने चाळीसगावचे माजी आमदार साहेबराव घोडे व अमळनेरचे अनिल भाईदास पाटील यांना पक्षातून निलंबित केले. मात्र पक्षाच्या जिल्हा कार्यालयात गोंधळ होऊन घोषणाबाजी झाली त्यांच्यावर कारवाई का नाही? असे विचारले असता या विषयावर गिरीश महाजन यांनी बोलणे टाळले.