चुक झाली तर कुणीही सुटत नाही गिरीश महाजन : ग्रामसेवकांनी ग्रामविकासात हातभार लावावा
By admin | Published: July 4, 2016 12:46 AM2016-07-04T00:46:01+5:302016-07-04T00:46:01+5:30
जळगाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.
Next
ज गाव : केंद्र शासनाने पंचायत राज व्यवस्था सक्षम करण्यासाठी निधीचे वितरण थेट ग्रामपंचायतींना सुरु केले आहे. त्यामुळे गावातील ग्रामसेवक व सरपंच हे गावाचे मालक आहे. निधी येत असताना सतर्क रहा. चुक झाली तर कुणीही सुटत नाही असा सूचक इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.रविवारी जिल्हा बँक सभागृहात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा राज्यस्तरीय मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार गुलाबराव पाटील, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, जि.प.सदस्य समाधान पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजन पाटील, मीनल कुटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.जबाबदारी वाढली पण जरा सांभाळूनकेंद्र शासनाने गावाच्या विकासाठी निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली आहे. मात्र आता माहितीचा अधिकार आहे. वेगळ्या मार्गाने त्याचा अवलंब होत आहे. त्यामुळे सतर्क रहा. लोकप्रतिनिधी किंवा साहेब सांगतात म्हणून कामे करू नका. कारण चुकीला आता माफी नाही असा सूचक इशारा गिरीशमहाजनयांनी दिला.गाव परिसर आजही अस्वच्छचग्रामसेवक, तलाठी आणि शिक्षक यांनी ठरविले तर गावाचे भविष्य बदलवू शकतात. मात्र आजही अनेक गावांमध्ये अस्वच्छता आहे. सर्वत्र उकिरडे, अस्वच्छता आहे. गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.हगणदरी मुक्त गाव प्रमाणपत्रासाठी कार्यकर्त्यांचा आग्रहपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले आहे. त्याला यशस्वी करण्याची सर्वाची जबाबदारी आहे. आजही अनेक गावांमध्ये उकिरडे कायम आहेत. सकाळी उघड्यावर शौचालयाला बसलेले असतात. ग्रामीण भागात असे चित्र असताना कार्यकर्ते हे हगणदरी मुक्त गावाचे बीडीओ किंवा सीईओ यांनी पत्र द्यावे त्यासाठी आपल्याकडे आग्रह धरत असतात.पाणी नाही तर शौचालय बांधायचे कसे?गेल्या वर्षी दुष्काळीस्थिती होती. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची वाईट अवस्था होती. त्यातच नागरिकांना हगणदरी मुक्त गावासाठी शौचालय बांधण्यास सांगण्याचा प्रयत्न केला असता, पिण्यासाठी पाणी नाही तर स्वच्छतागृहासाठी पाणी कोठून आणावे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो. त्यामुळे आधी पाणी द्या नंतर हगणदरी मुक्त गाव करू असे नागरिकांकडून सांगितले जाते. हा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी की अंडे असा आहे.