ज्येष्ठ शास्त्रीय आणि ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 06:44 AM2017-10-25T06:44:09+5:302017-10-25T06:46:05+5:30
कोलकाता : प्रख्यात शास्त्रीय गायिका तथा ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने येथील रुग्णालयात निधन झाले.
कोलकाता : प्रख्यात शास्त्रीय गायिका तथा ठुमरीसम्राज्ञी गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीतामधील एका सुरेल पर्वाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
जमीनदार कुटुंबात ८ मे १९२९ रोजी जन्मलेल्या गिरिजादेवी सेनिया आणि बनारस घराण्याच्या गायिका होत्या. त्यांना १९७२ मध्ये पद्मश्री, १९८९ मध्ये पद्मभूषण व २०१६ मध्ये पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले होते. १९७७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी त्या काळचे ज्येष्ठ गायक व सारंगीवादक सरजू प्रसाद मिश्रा यांच्याकडे ख्याल व टप्पा गायनाचे धडे गिरवले. ‘याद रहे’ या चित्रपटात त्यांनी नवव्या वर्षी काम केले व श्रीचंद मिश्रा यांच्याकडे शिक्षण
सुरू ठेवले. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे.