आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन रात्री बॉयफ्रेंडला घरी बोलवायची मुलगी, एक दिवस अचानक...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:40 PM2024-01-06T13:40:26+5:302024-01-06T13:41:08+5:30

एक मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून आई-वडिलांना जेवणासोबत झोपेच्या गोळ्या देत होती. यानंतर आई-वडील झोपले की ती तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलवायची.

girl call her boyfriend home at night after giving sleeping pills to her parents how secret revealed | आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन रात्री बॉयफ्रेंडला घरी बोलवायची मुलगी, एक दिवस अचानक...

आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन रात्री बॉयफ्रेंडला घरी बोलवायची मुलगी, एक दिवस अचानक...

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील तिवारीपूर पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून आई-वडिलांना जेवणासोबत झोपेच्या गोळ्या देत होती. यानंतर आई-वडील झोपले की ती तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलवायची.

मुलीच्या वडिलांना काहीतरी संशय आल्याने त्यांनी औषध घेतलं नाही आणि शांतपणे झोपले. रात्री आवाज आल्यावर ते उठले, त्यांनी मुलीच्या बॉयफ्रेंडला पकडून बेदम मारहाण केली. यावेळी परिसरातील लोकही आले, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवलं.

ही घटना तिवारीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अधियारी बाग परिसरात घडली. येथे दहावीच्या एका विद्यार्थिनीचे बिलंदपूर परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या तीन महिन्यांपासून ही मुलगी तिच्या आई-वडिलांना जेवणात झोपेच्या गोळ्या देऊन झोपवायची. यानंतर ती तिच्या प्रियकराला रात्री घरी बोलवत असे. परिसरातील लोकांना संशय आल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना माहिती दिली.

मुलीने पुन्हा झोपेच्या गोळ्या आई-वडिलांना दिल्या असता त्यांनी त्या खाल्ल्या नाहीत आणि ब्लँकेट घेऊन झोपण्याचं नाटक केलं. यानंतर रात्री मुलीचा बॉयफ्रेंड घरी येताच मुलीच्या वडिलांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. याची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना दिल्यावर तेही घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. 

परिसरातील नागरिकांनी दोघांना शांत करून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून हे प्रकरण शांत केले. अद्याप कोणाकडूनही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: girl call her boyfriend home at night after giving sleeping pills to her parents how secret revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.