ती झाली 'तो', फेक FB अकाऊंट सुरू करून मुलीशी केलं लग्न; हनिमूनच्या दिवशी समजलं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 04:52 PM2023-06-19T16:52:42+5:302023-06-19T17:03:43+5:30
एका मुलीने फेसबुकवर मुलाच्या नावाने प्रोफाईल सुरू केलं. तिने गुरुग्राममधील एका मुलीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. जवळपास तीन महिने दोघेही बोलल्या.
बिहारमधील छपरा येथील एका मुलीने फेसबुकवर मुलगा असल्याचे भासवून हरियाणातील गुरुग्राम येथील एका मुलीला पटवलं. नंतर दोघेही पळून गेले आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथे साप़डले. एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर मुंबईला जाऊन मंदिरात लग्न केलं. याच दरम्यान गुरुग्राममधील मुलीला समजलं की तिने ज्या व्यक्तीला जीवनसाथी बनवलं आहे तो मुलगा नसून मुलगी आहे. एकमेकांशी लग्न झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत.
छपरा येथील एकमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली. छपरातील एका मुलीने फेसबुकवर मुलाच्या नावाने प्रोफाईल सुरू केलं. तिने गुरुग्राममधील एका मुलीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. जवळपास तीन महिने दोघीही बोलल्या. फेसबुकवरच प्रेमात पडल्या, त्यानंतर दोघींनी लग्न करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यानंतर छपराची मुलगी दोन जून रोजी घर सोडून पळून गेली.
गुरुग्राममधील मुलीनेही तिचे घर सोडले. या दोन्ही मुली कानपूरमध्ये भेटल्या आणि तेथून त्या मुंबईला गेल्या आणि मंदिरात लग्न झाले. लग्नानंतर छपरा येथील मुलीने मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी केली. हनिमूनच्या दिवशी गुरुग्राममधील मुलीला समजलं की तिने ज्याच्याशी लग्न केलं आहे तो मुलगा नसून मुलगी आहे. यानंतर दोघीही 14 जून रोजी छपरा येथे पोहोचल्या. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतल्यानंतर दोघांनाही नातेवाईकांच्या ताब्यात दिलं.
गुरुग्राममधील मुलीने सिंदूर लावलं आहे. ती मुळात बिहारमधील गोपालगंजमधील बैकुंठपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी दोघींनाही पोलीस ठाण्यात नेले. दोघींनी पोलिसांसमोर आपली बाजू मांडली. चौकशीत गुरुग्राम येथील मुलीने छपरा येथील मुलीला नोकरीच्या बहाण्याने बोलावल्याचे निष्पन्न झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.