ऑनलाईन क्लाससाठी मुलीकडे नव्हता स्मार्टफोन; आई-वडिलांनी विकली गाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 05:34 PM2020-07-20T17:34:53+5:302020-07-20T17:35:43+5:30
कोरोना व्हायरसच्या संकटात शाळा-कॉलेजही बंद आहेत. पण, ऑनलाईन क्लासद्वारे मुलांना शिक्षण दिले जात आहे
हिमाचल प्रदेश - जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 46 लाख 46,707 इतकी झाली आहे. त्यापैकी 87 लाख 37,835 रुग्ण बरे झाले असले तरी 6 लाख 08,978 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 लाख 19,307 इतका झाला असून 27,514 जणांचं निधन झालं आहे. 7 लाख रुग्ण बरेही झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात शाळा-कॉलेजही बंद आहेत. पण, ऑनलाईन क्लासद्वारे मुलांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, त्यामुळे गरीब कुटुंबातील पालकांच्या समस्येत आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
आमदाराला लॉकडाऊनमध्ये क्रिकेट खेळणं पडलं महागात; जमिनीवर आपटले अन् FIRही दाखल झाला
हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील ज्वालाजी तालुक्यातील गुंबर गावात एक मनाला चटका लावणारा प्रसंग घडला. गुंबर गावातील कुलदीप नावाच्या व्यक्तीला मुलीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी गाय विकावी लागली. त्या पैशातून त्यानं मुलीला स्मार्टफोन खरेदी करून दिला. या घटनेनंतर प्रशासन आणि सरकारवर टीका होत आहे.
कुलदीपनं सांगितले की,''शाळेतून मुलीसाठी सातत्यानं गृहपाठ पाठवला जात होता. पण, आमच्याकडे स्मार्टफोन नसल्यामुळे तिला तो करता येत नव्हता. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी मला 6000 रुपयांत गाय विकावी लागली. त्यानंतर ऑनलाईन क्लास व गृहपाट करण्यासाठी मी स्मार्टफोन खरेदी करू शकलो.''
कोरोना संकटात शाळा-कॉलेज बंद आहेत. अशा परिस्थितीत सरकार मुलांसाठी ऑनलाईन क्लासवर जोर देत असल्याचे चित्र हिमाचल प्रदेशमध्ये दिसत आहे. त्यामुळे कुलदीपसारख्या गरीब कुटुंबीयांना आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे. कुलदीपच्या समस्येला प्रसार माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर शेजाऱ्याकडून त्याला काही मदत मिळू लागली, परंतु सरकारी मदत मिळालेली नाही. कुलदीपची मुलगी अनू चौथीत आहे, तर मुलगा वंश दुसऱ्या इयत्तेत शिकतो.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोरोनामुळे खेळाडूंवर आली उपासमारीची वेळ; दूध खरेदी करण्यासाठीही नाहीत पैसे!
WiFi दुरुस्तीसाठी भारतीय क्रिकेटपटूच्या घरी थेट 'NASA'वरून आला व्यक्ती!
IPL 2020 च्या मार्गात आणखी एक विघ्न; BCCIने ठरवलेल्या तारखांवर ब्रॉडकास्टर नाराज, पण का?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वडिलांना झाला कोरोना; आईच्या रिपोर्टची प्रतीक्षा
भारतामुळे शोएब मलिकचा इंग्लंड दौरा लांबणीवर; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं ट्विट
बेन स्टोक्सची तुफान फटकेबाजी; विंडीजसमोर 312 धावांचे लक्ष्य!