CoronaVirus Live Updates : तापाला हलक्यात घेऊ नका, वेळीच सावध व्हा; व्हायरलच्या नादात कोरोनामुळे झाला चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:34 PM2021-09-05T12:34:39+5:302021-09-05T12:43:49+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : व्हायरलच्या नादात कोरोनामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. तर एका बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अत्यंत सावध राहणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.
तापाला हलक्यात घेऊ नका, वेळीच सावध व्हा सांगणारी एक घटना बिहारमध्ये घडली आहे. व्हायरलच्या नादात कोरोनामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना आता समोर आली आहे. तर एका बाळावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणाच्या पाटलीपुत्र येथील आरोही कुमारी हिला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तिच्या कुटुंबीयांना तिला व्हायरल ताप असल्याचं वाटत होतं. पण प्रत्यक्षात भलतंच घडलं. मुलीचे काका राजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप येत होता.
CoronaVirus Live Updates : कोरोनामुळे देशभरात तब्बल 4 लाख लोकांना गमवावा लागला जीव#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19Indiahttps://t.co/bRDIwDhaaf
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
आणखी एका लहान मुलावर सध्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू
अचानक मुलीचा प्रकृती आणखी बिघडली. गंभीर झाल्यास तिला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच तिचा मृत्यू झाला. आणखी एका लहान मुलावर सध्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. व्हायरल आणि कोरोनाची लक्षणं ही सारखीच असल्याने नेमकं काय झालंय हे ओळखण्यास कठीण होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.
CoronaVirus Live Updates : अरे व्वा! 116 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात#coronavirus#CoronavirusUpdateshttps://t.co/WCHmODs8CN
— Lokmat (@MiLOKMAT) September 5, 2021
कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 42,766 नवे रुग्ण; रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर
गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज 40 हजारांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (5 सप्टेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 42,766 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटी 21 लाख 38 हजार 92 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 10 हजार 48 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 97.42 टक्क्यांवर आहे.
CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! अमेरिकेत रुग्णसंख्येने पार केला 4 कोटींचा टप्पा; 6.62 लाख लोकांनी गमावला जीव #Corona#CoronavirusPandemic#DeltaVariant#Americahttps://t.co/LPjZAVt2jb
— Lokmat (@MiLOKMAT) September 4, 2021