मुलाला सोडण्यासाठी घरचे गेले स्टेशनवर; अन् संधीचा फायदा घेत मुलगी प्रियकरासोबत गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 01:10 PM2023-01-17T13:10:21+5:302023-01-17T13:10:55+5:30

बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

girl eloped with her boyfriend when the family members went to railway station for drop off her younger brother in Bihar | मुलाला सोडण्यासाठी घरचे गेले स्टेशनवर; अन् संधीचा फायदा घेत मुलगी प्रियकरासोबत गेली पळून

मुलाला सोडण्यासाठी घरचे गेले स्टेशनवर; अन् संधीचा फायदा घेत मुलगी प्रियकरासोबत गेली पळून

googlenewsNext

नवी दिल्ली : बिहारमधील जमुई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मलयपूर पोलीस स्टेशन हद्दीतील केरीबाग टोला येथील एका कुटुंबातील सदस्य आपल्या मुलाला स्टेशनवर सोडण्यासाठी गेले असता मुलीने धक्कादायक कृत्य केले. दरम्यान, संधी मिळताच त्यांची मुलगी प्रियकरासह पळून गेली. याप्रकरणी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे.

संबंधित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले, माझा मुलगा ८ जानेवारीला निघाला होता आणि आम्ही त्याला सोडण्यासाठी मलयपूर रेल्वे स्टेशनवर गेलो होतो. संध्याकाळी 7 वाजता आमच्या मुलाला बलिया-सियालदह एक्स्प्रेसमध्ये बसवून आम्ही घरी परतलो तेव्हा आम्हाला आमची मुलगी घरातून बेपत्ता असल्याचे दिसले. आम्ही तिचा खूप शोध घेतला, पण ती काही सापडली नाही.

प्रियकराच्या घरच्यांविरूद्ध FIR दाखल 
वडिलांनी सांगितले की, अधिक चौकशी केल्यावर कळले की, माझ्याच गावातील कार्तिक मांझी यांचा मुलगा सूरज मांझी याने माझ्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. दोघांचे प्रेमप्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यानंतर ती तिच्या प्रियकरासह पळून गेल्याचे उघड झाले. बेपत्ता मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात कार्तिक मांझी, त्यांची पत्नी सुमा देवी, बटू मांझी आणि इतरांवर लग्नाच्या उद्देशाने आपल्या मुलीचे अपहरण केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. मलयपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख वीरभद्र सिंग यांनी सांगितले की, अर्जाच्या प्राथमिक माहितीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: girl eloped with her boyfriend when the family members went to railway station for drop off her younger brother in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.