प्रेमासाठी काय पण! परीक्षा द्यायला गेली, लग्न करूनच परतली; आता सतावतेय 'ही' भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 04:21 PM2024-02-17T16:21:25+5:302024-02-17T16:27:15+5:30
पेपर देण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली.
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मुस्कान टाक ही 20 वर्षांची मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाच्या प्रेमात पडली. पाच वर्षे दोघांमध्ये अफेअर सुरू होतं. कुटुंबीयांना मुलीचं दुसऱ्या ठिकाणी लग्न लावायचं होतं. त्यानंतर एके दिवशी पेपर देण्याच्या बहाण्याने ती घरातून निघून गेली आणि प्रियकरासह पळून गेली. नंतर जेव्हा ती प्रेमविवाह करून परतली तेव्हा तिला घरच्यांची भीती वाटू लागली. त्यामुळे तिने प्रियकरासह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि सुरक्षा मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार, अजमेर जिल्ह्यातील अरईमधील मुस्कान टाक या तरुणीने सुजानगडच्या सुरवास गावातील मनोज मेघवाल या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मनोज हा एका विमा कंपनीत कर्मचारी आहे. आता दोघांनी सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. दोघेही सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचले. मुस्कान टाक एसपी ऑफिसमध्ये पोहोचली आणि सांगितलं की दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत आहेत.
मनोज कुमार मेघवाल हा अराई येथे राहतो. तिथे दोघांची ओळख झाली आणि मोबाईलवर बोलू लागले. मुस्कानच्या घरच्यांची इच्छा होती की तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी व्हावे. त्यामुळे मुस्कानने मनोज कुमारसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुस्कान ही बीएची विद्यार्थिनी आहे. पेपरला बसण्यासाठी 9 फेब्रुवारीला ती घरातून निघाली होती. मनोज कुमार तिथे आधीच त्याची वाट पाहत होता.
मुस्कान पेपर न देता मनोज कुमारसोबत ट्रेनने सुजानगडला आली. दोघांनी 10 फेब्रुवारीला सुजानगडमध्ये प्रेमविवाह केला. 20 वर्षीय मुस्कानने सांगितले की, तिचे वडील मॅनेजर आहेत. आता दोघेही एसपी कार्यालयात पोहोचले आणि सुरक्षेची विनंती केली. त्यांच्या प्रेमविवाहामुळे घरातील सदस्य रागावून त्रास देऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत आहे.