चालत्या बसमध्ये हस्तमैथून करणा-याला तरुणीने शिकवला धडा, व्हिडीओ रेकॉर्ड करुन केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 01:24 PM2018-02-12T13:24:04+5:302018-02-12T13:24:48+5:30

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली तरुणी बसमधून प्रवास करत असताना बाजूच्या सीटवर बसलेली एक व्यक्ती हस्तमैथून करत होता.

A girl records a video of man masturbated in bus | चालत्या बसमध्ये हस्तमैथून करणा-याला तरुणीने शिकवला धडा, व्हिडीओ रेकॉर्ड करुन केला पोस्ट

चालत्या बसमध्ये हस्तमैथून करणा-याला तरुणीने शिकवला धडा, व्हिडीओ रेकॉर्ड करुन केला पोस्ट

Next

नवी दिल्ली - महिलांसोबत होणा-या अश्लील घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. काही दिवसांपुर्वी मुंबईत तरुणींसमोर हस्तमैथून करत असल्याची घटना समोर आल्यानंतर त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. त्यावेळी अनेकांनी अशाप्रकारे अश्लील कृत्य करणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र काही दिवस सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा शांत झाला होता. पण राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा अशी घटना समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीला या घटनेला सामोरं जावं लागलं आहे. 

दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असलेली तरुणी बसमधून प्रवास करत असताना बाजूच्या सीटवर बसलेली एक व्यक्ती हस्तमैथून करत होता. यावेळी तरुणीने त्या व्यक्तीचा व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट करुन टाकला. तरुणीने वसंत विहार पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रारदेखील दाखल केली आहे. 


पीडित तरुणीने घटनेबद्दल बोलताना सांगितलं की, 'गर्दीने खचाखच भरलेल्या बसमधून आपण प्रवास करत असताना आपल्या बाजूच्या सीटवर बसलेला व्यक्ती हस्तमैथून करत होता'. पुढे बोलताना तरुणीने सांगितलं की, 'मला आश्चर्याचा धक्का बसला, पण नंतर मी त्या व्यक्तीचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. लोकांनाही या घटनेची माहिती मिळावी यासाठी मी तो व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला'. 'लोक अशाप्रकारच्या घटनांना लैंगिक छळ मानत नाहीत', असंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. 

सीएसएमटी स्थानकावरील घटना - 
सीएसटी स्थानकावर एका प्रवाशाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन केल्याची घटना घडली होती  ही घटना 8 जुलै रोजी घडली होती. 'तपोवन एक्स्प्रेस'मध्ये तरूणीला पाहून अश्लिल चाळे करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. 29 जून रोजी सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सीएसटी स्थानकावर हा प्रकार घडला होता. 22 वर्षाची तरुणी कामानिमित्त नाशिकला निघाली होती. यावेळी सीएसटी स्थानकात आल्यावर ती प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर उभ्या असलेल्या 'तपोवन एक्स्प्रेस'ने नाशिकला जाण्यासाठी निघाली. त्यानंतर स्थानकावर अंधार आणि प्लॅटफॉर्मवर कोणी नाही हे बघून ट्रेनमध्ये थांबलेल्या अशोक प्रधान या विकृत तरुणाने तिच्याकडे पाहून हस्तमैथून करत असल्याचे दिसून आले होते. या प्रकारामुळे घाबरल्याने ती तरुणी दुसरीकडे जाऊन उभी राहिली. पण तिथेही तो तिच्यासमोर असणाऱ्या बोगीत जाऊन उभा राहिला आणि अश्लिल चाळे करू लागला. यावेळी तिने पुरावा म्हणून त्या विकृताचा व्हिडिओही काढला. त्यानंतर याची माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी त्यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. दरम्यान, या झालेल्या प्रकाराबद्दल मीडियाने बातमी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अशोक प्रधान याला तब्बल दहा दिवसांनंतर अटक केली होती. 

पवईतही घडली अशीच घटना
पवईमध्येही दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाने 19 वर्षीय युवतीला आपल्या पँटची चेन खोलून दाखवली होती. पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमधून घरी परतत असताना पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली होती. 
 

Web Title: A girl records a video of man masturbated in bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.