"इश्क, धरना और निकाह..."; दरवाज्यात येऊन बसली प्रेयसी, प्रियकराने घरच्यांसोबत ठोकली 'धूम', मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 09:10 PM2021-03-04T21:10:14+5:302021-03-04T21:11:06+5:30

बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणी शीशगजमधील एका गावात आपल्या मोठ्या बहिणीकडे गेली होती. याच वेळी धनेली येथील एक तरुणही तेथे आला होते. याथेच दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. (Girlfriend and boyfriend)

Girl Sit at the door of boyfriend but boyfriend ran away with the family, then got married | "इश्क, धरना और निकाह..."; दरवाज्यात येऊन बसली प्रेयसी, प्रियकराने घरच्यांसोबत ठोकली 'धूम', मग...

"इश्क, धरना और निकाह..."; दरवाज्यात येऊन बसली प्रेयसी, प्रियकराने घरच्यांसोबत ठोकली 'धूम', मग...

Next

बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक प्रेयसी आपल्या प्रियकराच्या घराच्या दरात जाऊन बसली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संबंधित प्रियकर आणि त्याच्या घरचे लोक गडबडले आणि घराला कुलूप लावून त्यांनी तेथून पळ काढला. अखेर निकाहानंतरच प्रेयसी शांत झाली. (Girl Sit at the door of boyfriend but boyfriend ran away with the family, then got married)

संपूर्ण घटना अशी, की बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुणी शीशगजमधील एका गावात आपल्या मोठ्या बहिणीकडे गेली होती. याच वेळी धनेली येथील एक तरुणही तेथे आला होते. याथेच दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. 

आता आरोप असा आहे, की संबंधित तरुणाने या तरुणीला प्रेमाचे अमिष दाखवून घरी आणले होते. यानंतर अनेक दिवस तिच्यासोबत संबंध ठेऊन त्याने तिला हरियाणातील आपल्या नातलगांकडे नेले. काही दिवस तेथे राहिल्यानंतर त्याने तिला बहिणीकडे गावात सोडले. तरुणीने आरोप केला होता, की संबंधित तरुणाने निकाह करण्याचे आश्वासन दिले होते.

एवढेच नाही, तर जेव्हा तरुणी फोन करत होती, तेव्हा तो तिच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हता. अखेर तिने संबंधित पोलीस ठाण्यातही तक्रार दिली, मात्र, काहीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे ती दुपारच्या सुमारास थेट प्रियकराच्या घरीच पोहोचली. संबंधित तरुणीने 112 क्रमांकावर फोन केला. मात्र, पोलीस उलट या तरुणीवरच घरी जाण्याचा दबाव टाकत होते.

अखेर संबंधित तरुणी प्रियकराच्या दारातच जाऊन बसली. या घटनेमुळे रात्री जवळपास दीड वाजेपर्यंत गावातील लोक जमलेले होते. याच दरम्यान संबंधित मुलगा आणि त्याचे कुटुंबीयही परतले. मात्र, प्रेयसीला दारातच पाहून ते पुन्हा माघारी फिरू लागले. तेव्हा काही जबाबदार नागरिकांनी संबंधित तरुणीला आणि तरुणाच्या कुटुंबीयांना समजावले आणि निकाहासाठी तयार केले. यानंतर मौलवींना बोलावण्यात आले आणि या दोघांचा संबंधित तरुणीच्या बहिणीच्या घरी निकाह करण्यात आला. 'इश्क, धरना और निकाह'चे हे प्रकरण जवळपासच्या संपूर्ण भागातच चर्चेचा विषय बनले आहे. 

Web Title: Girl Sit at the door of boyfriend but boyfriend ran away with the family, then got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.