डोक्याला हात लावाल! दहावीला पोरीला ९४ टक्के मिळाले, तरीही प्रॅक्टिकलला नापास केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:52 PM2023-04-25T18:52:22+5:302023-04-25T18:53:03+5:30

उत्तर प्रदेशमध्ये आज दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतू एका विद्यार्थिनीचा निकाल पाहून सर्वांनी डोक्याला हात लावला आहे.

Girl student got 94 percent in class 10th, but still failed the practicals, Everybody Shocked after UP Board Reasult | डोक्याला हात लावाल! दहावीला पोरीला ९४ टक्के मिळाले, तरीही प्रॅक्टिकलला नापास केले

डोक्याला हात लावाल! दहावीला पोरीला ९४ टक्के मिळाले, तरीही प्रॅक्टिकलला नापास केले

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये आज दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. परंतू एका विद्यार्थिनीचा निकाल पाहून सर्वांनी डोक्याला हात लावला आहे. अमेठीच्या मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. यामागे युपी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचे बोलले जात आहे. 

भावना वर्मा नावाच्या विद्यार्थीनीला ९४ टक्के मार्क मिळाले आहेत. परंतू तिला प्रॅक्टिकलमध्ये १८० च्या जागी १८ च मार्क देण्यात आले आहेत. मार्कलिस्टमध्ये तिला एकूण ४०२ गुण मिळाले आहेत. परंतू, प्रॅक्टिकलमध्ये पाच विषयांत तिला १८ म्हणजेच एका विषयाला तीन मार्क देण्यात आले आहेत. आता ही शाळेची चूक की बोर्डाची याचीच चर्चा रंगली आहे. 

तिच्या शाळेने यावर आपली बाजू मांडली आहे. भावना ही खूप हुशार मुलगी आहे. आम्ही तिला प्रत्येक विषयाला ३० मार्क असे १८० मार्क दिसे होते. परंतू, बोर्डाच्या चुकीमुळे तिला प्रत्येक विषयाला ३ मार्क दिल्याचे दिसत आहे. जर हे मार्क नीट दिले तर तिचे ६०० पैकी ५६२ मार्क होतात. यानुसार तिला ९४ टक्के पडायला हवे होते, परंतू तिला नापास दाखविण्यात आले आहे. 

नापास झाल्याचा निकाल पाहून विद्यार्थीनीला मानसिक धक्का बसला आहे. तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. 

Web Title: Girl student got 94 percent in class 10th, but still failed the practicals, Everybody Shocked after UP Board Reasult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.