श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक करणारी ती तरूणी आता बनली जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 10:52 AM2017-12-06T10:52:58+5:302017-12-06T10:58:00+5:30
श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे.
श्रीनगर- श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे. काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या पोस्टरवर झळकलेली अफ्शानने मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत त्यांना राज्यातील खेळाडुंच्या समोर असणाऱ्या समस्यांचा माहिती दिली. तसंच त्या समस्यांचं निवारण करण्याची मागणीही केली. माझं आयुष्य नेहमीसाठी बददलं आहे. मला विजेती बनायचं आहे. राज्याला व देशाला गौरव मिळवून देण्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. आता मागे वळून पाहण्याची इच्छा नसल्याच्या भावना अफ्शान बोलून दाखविली. अफशाच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा बनविला जाणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक अफशावर सिनेमा बनवणार असल्याची चर्चा आहे.
अफ्शानने मंगळवारी जम्मू-काश्मीर महिला फुटबॉल टीममधील इतर खेळाडुंसह गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनीचं टीमला भेटीचं निमंत्रण दिलं होतं. अर्धा तास चाललेल्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी म्हंटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये खेळांना प्रोत्साहन देऊन योग्य नियोजन केलं तर तेथिल तरूण दहशतवाद आणि इतर बेकायदेशीर कामांपासून दूर राहुन स्वतःमध्ये असलेले कलागुण विकसित करती, ज्यामुळे राज्याचं नावं मोठं होइल.
जम्मू-काश्मीरमध्ये खेळासाठी योग्य नियोजन नाही, याबद्दल राजनाथ सिंह यांना सांगितल्यावर त्यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा आग्रह केला. पंतप्रधान विशेष पॅकेजच्या अंतर्गत सुरूवातील 100 कोटी रूपयांची योजना केली जाईल, असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिल्याचं अफ्शानने सांगितलं.
श्रीनगरमध्ये राहणारी अफ्शानने सध्या मुंबईतील एका क्लबसाठी खेळते आहे.