वडिलांना भेटण्यासाठी जाणार्‍या मुलीचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : ४० फुटापर्यंत नेले महिलेला फरफटत

By admin | Published: May 21, 2016 11:48 PM2016-05-21T23:48:10+5:302016-05-21T23:48:10+5:30

जळगाव: जळगावात चुलत भावाकडे घरभरणी व जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भुसावळ येथे आजारी वडिलांना भेटण्यासाठी जाणार्‍या शोभाबाई दादाभाऊ केदार (वय ५५ रा.राजमाने ता.चाळीसगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जान्हवी हॉटेलसमोर ट्रक अपघातात मृत्यू झाला. मागून आलेल्या ट्रकने शोभाबाई यांना चाळीस फुटापर्यंत फरफटत नेले.या अपघात पती दादाभाऊ कौतिक केदार हे किरकोळ जखमी झाले आहेत.

The girl, who was going to meet her father, died on the highway. | वडिलांना भेटण्यासाठी जाणार्‍या मुलीचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : ४० फुटापर्यंत नेले महिलेला फरफटत

वडिलांना भेटण्यासाठी जाणार्‍या मुलीचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : ४० फुटापर्यंत नेले महिलेला फरफटत

Next
गाव: जळगावात चुलत भावाकडे घरभरणी व जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भुसावळ येथे आजारी वडिलांना भेटण्यासाठी जाणार्‍या शोभाबाई दादाभाऊ केदार (वय ५५ रा.राजमाने ता.चाळीसगाव) यांचा शनिवारी दुपारी साडे तीन वाजता राष्ट्रीय महामार्गावरील जान्हवी हॉटेलसमोर ट्रक अपघातात मृत्यू झाला. मागून आलेल्या ट्रकने शोभाबाई यांना चाळीस फुटापर्यंत फरफटत नेले.या अपघात पती दादाभाऊ कौतिक केदार हे किरकोळ जखमी झाले आहेत.
राजमाने येथील दादाभाऊ केदार व पत्नी शोभाबाई हे दाम्पत्य दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.झेड.५८४५) शोभाबाई यांचे चुलत भाऊ जितेंद्र रामदास सुरवाडे (रा.नितिन साहित्या नगर, सुप्रीम कॉलनी) यांच्याकडे घरभरणीच्या कार्यक्रमासाठी आले होते. शोभाबाई यांचे माहेर भुसावळचे आहे. तेथे वडील धर्मा गणा सुरवाडे यांना लकव्याचा आजार असल्याने त्यांना भेटण्यासाठी दुपारी घरभरणी व जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे दाम्पत्य भुसावळकडे रवाना झाले.
पंधरा मिनिटाच आला मृत्यूचा निरोप
केदारे हे दुचाकीने जात असताना महामार्गावर हॉटेल जान्हवी समोर मागून आलेल्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या दुचाकीच्याजवळून ट्रक नेल्याने त्यात शोभाबाई या ओढल्या गेल्या. तर दादाभाऊ हे दुचाकीसह लांब फेकले गेले. मध्यभागी असलेल्या भागात त्या अडकल्याने चालकाने त्यांना तब्बल चाळीस फुटापर्यंत फरफटत ओढत नेले. एक्सेलमध्ये अडकल्यामुळे त्यांच्या पोटातील आतडे बाहेर आले होते तर चेहर्‍याचाही चेंदामेंदा झाला होता. दादाभाऊ यांनी ही घटना जितेंद्र सुरवाडे यांना कळविली. घरुन गेल्यानंतर पंधरा मिनिटातच मृत्यूचा निरोप आल्याने त्यांच्या परिवाराने घटनास्थळी धाव घेतली.
ट्रकचालकाला पाठलाग करून पकडले
या अपघातातनंतर ट्रकचालक जागेवर न थांबता तेथून पळून गेला, त्यामुळे रस्त्यावर चालणार्‍या दुचाकीस्वारांनी त्याचा पाठलाग केला. नशिराबाद नाक्याजवळ त्याला अडवून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
शनी पेठ पोलीस धावले
दरम्यान, नागरिकांनी या अपघाताबाबत शनी पेठ व एमआयडीसी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. शनीपेठचे सहायक निरीक्षक संदीप पाटील यांनी हद्दचा वाद न घालता हेडकॉन्स्टेबल अनिल धांडे व संजय धनगर यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. रस्त्यावर उपलब्ध झालेल्या मालवाहू रिक्षात टाकून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. यावेळी नातेवाईक महिलांनी प्रचंड आक्रोश केला.
शोभाबाई यांना दोन मुले व एक मुलगी आहे. विलास हा पुणे तर नीलेश हा सुरतला कामाला आहे. मुलगी वापीला राहते. तिघांची लग्न झालेले आहे. तर दोघंजण गावात शेती करायचे.

Web Title: The girl, who was going to meet her father, died on the highway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.