छळवणुकीचा विरोध करणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने मारहाण
By admin | Published: June 3, 2016 02:53 AM2016-06-03T02:53:15+5:302016-06-03T02:53:15+5:30
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक येथे गुरुवारी छेड काढणाऱ्या एका युवकाचा विरोध केल्यावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने बेदम मारहाण करण्यात आली.
माणिकचक : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक येथे गुरुवारी छेड काढणाऱ्या एका युवकाचा विरोध केल्यावरून इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सळईने बेदम मारहाण करण्यात आली. तिच्यासोबत तिची आई व स्थानिक ग्रामपंचायतच्या एका सदस्यालाही मारहाण झाली.
नूर अली (२०) हा युवक तिची वर्षभरापासून छेड काढत तिला त्रास देत होता. त्याची तक्रार करण्यास विद्यार्थिनी आईला घेऊन लानूरच्या घरी आली. त्या दोघी नूरच्या घरासमोर आल्या तेव्हा नूरच्या कुटुंबीयांनी त्यांना लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य आयूष करानी यांनी हस्तक्षेप केला तेव्हा हल्लेखोरांनी त्यांचीही पिटाई केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. हल्ल्यात विद्यार्थिनी, तिची आई आणि आयुष असे तिघेही गंभीर जखमी झाले. (वृत्तसंस्था)