धक्कादायक! बिस्किट आणायला गेलेल्या मुलीचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू, 8 कुत्रे अर्धातास तोडत होते लचके
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:20 AM2023-04-08T02:20:58+5:302023-04-08T02:21:20+5:30
ही घटना छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई वडिल वीट भिट्टीवर मजूर म्हणून काम करतात.
बिस्किट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका पाच वर्षिय मुलीवर रस्त्यातच आठ कुत्र्यांनी हल्ला केला. हे कुत्रे तब्बल अर्धा तास मुलीचे लचके तोडत होते. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना छत्तीसगड मधील कोरिया जिल्ह्यात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे आई वडिल वीट भिट्टीवर मजूर म्हणून काम करतात.
अजय माझी यांची 5 वर्षांची मुलगी शुक्रवारी सकाळी बिस्किट आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. रस्त्यात जवळपास आठ कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. हे कुत्रे जवळपास अर्धातास तिचे लचके तोडत होते. कुत्र्यांनी एका शेताजवळ या मुलीवर हल्ला केला. घरापासून दूर असल्याने मुलेचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही. पण याचवेळी तेथून जाणाऱ्या काही लेकांनी हे दृष्य पाहिल्यानंतर कुत्र्यांना हुस्कावले. यानंतर, मुलीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात सन्नाटा पसरला आहे.
संबंधित मुलीचे आई-वडील मजूर आहेत. मुलीला सकाळी भूक लागल्याने ती बिस्किट आणण्यासाठी दुकानात गेली होती. रस्त्यात काही कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे, असे सिटी पोलीस चौकीचे प्रभारी अश्वनी सिंह यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना, बैकुंठपूर जिल्हा रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. अभिषेक गधेवाल यांनी सांगितले की, मुलीला दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. कुत्र्यांनी तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेतलेला होता.