UPSC पास होताच गर्लफ्रेंडने दाखवला ठेंगा; 5 वेळा परीक्षा दिलेल्या बॉयफ्रेंडने सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 11:44 AM2022-10-22T11:44:11+5:302022-10-22T11:56:35+5:30
हरिंदरने पाच वेळा यूपीएससी या परिक्षेसाठी प्रयत्न केले. तो एकदा मुलाखतीपर्यंतही पोहोचला. मात्र, तो यूपीएससी पास झाला नाही.
बिहारमधील एका छोट्याशा गावातून एक तरुण आयएएस होण्याचं स्वप्न घेऊन दिल्लीत आला होता. येथे येऊन त्याने मुखर्जी नगरमध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र, पाच वेळा प्रयत्न करूनही त्याची निवड झाली नाही. याच दरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडने यूपीएससीची परीक्षा पास केली. पण यानंतर प्रेयसीने जे केले, त्यामुळे तरुण निराश झाला.
एका यूट्यूब चॅनलशी बोलताना हरिंदर पांडे नावाच्या व्यक्तीने सांगितले की, सुमारे 10 वर्षांपूर्वी तो बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून दिल्लीत आला होता. येथे त्याने आयएएसची तयारी सुरू केली. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. हरिंदरने पाच वेळा यूपीएससी या देशातील सर्वात कठीण परिक्षेसाठी प्रयत्न केले. तो एकदा मुलाखती पर्यंतही पोहोचला. मात्र, तो यूपीएससी पास झाला नाही.
हरिंदरच्या आयुष्यात याच दरम्यान एक मुलगी आली. मैत्रीनंतर तो तिच्या प्रेमात पडतो. ही 2014 मधील गोष्ट आहे. ही मुलगीही यूपीएससीची तयारी करत होती. हरिंदर म्हणाला की, याच दरम्यान युपीएससीमध्ये या मुलीची निवड झाली. पण काही दिवसांनी तिने माझा नंबर ब्लॉक केला. त्याच्या गर्लफ्रेंडने केलेल्या या कृत्यानंतर हरिंदर खूप निराश झाला. दरम्यान, त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक टिप्सही दिल्या.
आपल्या एका व्हिडीओमध्ये हरिंदर पुढे म्हणाला की, दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पुस्तकं वाचली. खूप अभ्यास केला. पैशाची कमतरता होती म्हणून गार्डची नोकरीही केली. पण काहीही व्यवस्थित झालं नाही. यूपीएससी पास झालो नसलो तरी अभ्यासादरम्यान जे काही शिकलो ते आयुष्यभर उपयोगी पडेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"