प्रेमासाठी काय पण! प्रियकरासोबत पळून जात होती मुलगी, आईने पाठलाग करून पकडलं अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:16 PM2022-07-05T12:16:07+5:302022-07-05T12:17:03+5:30
एक कपल लग्न करण्याच्या विचाराने घरातून पळून जात होते. पण हा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईला कळताच तिने त्यांचा पाठलाग करून काही अंतर गेल्यावर दोघांना पकडलं.
नवी दिल्ली - बिहारच्या दानापूरमध्ये अजब प्रेमाची गजब गोष्ट समोर आली आहे. एक कपल लग्न करण्याच्या विचाराने घरातून पळून जात होते. पण हा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईला कळताच तिने त्यांचा पाठलाग करून काही अंतर गेल्यावर दोघांना पकडलं. यावेळी मुलीची आई जोरात आरडाओरड करू लागली, त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली. कपलला त्यांची इच्छा विचारली असता त्यांनी जाहीरपणे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मग गावकऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिरात त्याचं लग्न लावून दिले.
मुलीची आईही लग्नाची साक्षीदार झाली. संपूर्ण परिसरात या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अनिल कुमार आणि इंदू कुमारी एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात भेटले होते. लग्नाच्या कार्यक्रमात दोघांची ओळख झाली आणि यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. दुसरीकडे, प्रियकर आणि प्रेयसीच्या कुटुंबीयांचा या नात्याला नकार होता. दोघांनी लग्न करावे, अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय घेऊन अनिल त्याच्या प्रेयसीला सोबत घेऊन परदेशात जाऊ लागला.
हे पाहून मुलीची आई त्यांच्यामागे जाऊ लागली. प्रेयसीची आई खिरीमोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोडिहारा गावातून मैरी बिघा या दुसऱ्या गावात त्यांच्यामागे गेली. यानंतर इंदूच्या आईने दोघांनाही पकडून आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे ग्रामस्थ तेथे जमा झाले होते. ग्रामस्थांनी अनिल आणि इंदूला पकडले. या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी त्या दोघांकडून त्यांची इच्छा जाणून घेतली. तेव्हा अनिल आणि इंदूने एकमेकांशी लग्न करणार असल्याचे सांगितले.
गावकऱ्यांनी गावातील मंदिरात आणून मातृदेवतेला साक्षी ठेवून पारंपारिक रीतीरिवाजांनी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर दोघांनाही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात निरोप दिला. प्रियकर अनिल हा अरवाल जिल्ह्यातील करपी पोलीस ठाण्यांतर्गत बेलखेडा गावातील रहिवासी सत्येंद्र पंडित यांचा मुलगा आहे. तर त्याची गर्लफ्रेंड इंदू ही पाटणा जिल्ह्यातील खेरीमोड पोलीस स्टेशन क्षेत्रातील कोडी हारा गावातील रहिवासी योगेंद्र पंडित यांची मुलगी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.