मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

By admin | Published: February 21, 2016 12:59 AM2016-02-21T00:59:51+5:302016-02-21T00:59:51+5:30

मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन

The girls are not allowed to use mobile | मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी

Next

अलिगढ : मोबाईलमुळे मुली बिघडत असल्याचे सांगत अलिगढमधील एका गावच्या खाप पंचायतीने १८ वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यास बंदी घातली आहे. एवढेच नाही तर बंदीचे उल्लंघन करणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांना गावचे रस्ते स्वच्छ करण्याची शिक्षा भोगावी लागेल, असेही जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला स्मार्टफोनद्वारे जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असतानाच इगलस तालुक्यातील बसौली गावच्या पंचायतीने बंदीचा निर्णय घेतला, हे उल्लेखनीय. बसौली गावच्या खाप पंचायतीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, गावातील अविवाहित मुली मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर करणार नाहीत. मोबाईल वापरताना पकडले गेल्यास संबंधित मुलीच्या कुटुंबियांना गावातील पाचशे मीटरचा रस्ता सलग पाच दिवस स्वच्छ करावा लागेल किंवा मग एक हजार रुपये दंड होईल. (वृत्तसंस्था)

मोबाईलच्या वापरामुळे मुलींचे मुलांशी संबंध निर्माण होऊन त्यांचे आयुष्य बरबाद होते. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हाही घडतो.
आमच्या काळात अशा समस्या नव्हत्या; मात्र या तंत्रज्ञानामुळे मुलींच्या आयुष्याची हानी होत असून आम्हाला त्याला आळा घालायचा आहे, असे पंचायतीचे समन्वयक रामवीरसिंह यांनी सांगितले.
मुली मोबाईल वापरतात किंवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

Web Title: The girls are not allowed to use mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.