एक लाखात मुलीचा सौदा, वडिलांनी स्वत:च आरोपीकडे नेले आणि..., पीडितेने मांडली व्यथा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:20 IST2024-12-24T19:19:09+5:302024-12-24T19:20:07+5:30

Crime News: झारखंडमधील साहिबगंज येथे वडील आणि मुलीच्या नात्याला लाजेने मान खाली घालायला लावेल अशी घटना घडली आहे. येथे एक लाख रुपयांच्या मोहापायी बापानेच आपल्या अल्पवीयन मुलीच्या अब्रूचा सौदा केला.

Girl's deal for one lakh, father himself took her to the accused and..., victim expresses grief | एक लाखात मुलीचा सौदा, वडिलांनी स्वत:च आरोपीकडे नेले आणि..., पीडितेने मांडली व्यथा  

एक लाखात मुलीचा सौदा, वडिलांनी स्वत:च आरोपीकडे नेले आणि..., पीडितेने मांडली व्यथा  

झारखंडमधील साहिबगंज येथे वडील आणि मुलीच्या नात्याला लाजेने मान खाली घालायला लावेल अशी घटना घडली आहे. येथे एक लाख रुपयांच्या मोहापायी बापानेच आपल्या अल्पवीयन मुलीच्या अब्रूचा सौदा केला. या बापाच्या मित्राने या  अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. त्यानंतर पीडित मुलगी घरी आल्यावर या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपी बाप आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिचे वडील आणि छोट्या बहिणीसह साहिबगंज येथे राहते. तिच्या बापाचा मित्र संतोष यादव हा बिहारमधील कटिहार येथील रहिवासी आहे. संतोष याने पीडित मुलीचा बाप असलेल्या आपल्या मित्राला १ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात त्याने मित्राच्या मोठ्या मुलीला आपल्या घरी बोलावले होते. ठरल्यानुसार आरोपीचा मित्र असलेला त्या पीडित मुलीचा बाप आपल्या दोन्ही मुलींना घेऊन  त्याच्याकडे घेऊन आला. त्यानंतर बाजारात जाण्याचा बहाणा करून आपल्या मोठ्या मुलीला घेऊन तिथून गेला. 

मुलीचा बाप गेल्यानंतर तिथे थांबलेल्या मोठ्या मुलीला प्रताडित करण्यास सुरुवात केली. तिच्याशी लगट करून त्याने बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलीचा बाप तिथे आला आणि तिला घेऊन गेला. दरम्यार, पीडित मुलीने शेजारील महिलेला तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्या महिलेने आणखी काही लोकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या बापाला खडसावून चौकीश केली. तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. त्यानंतर या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली. 

त्यानंतर सहपोलिस निरीक्षक अमित गुप्ता हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित आरोपी वडिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर संतोष यादव यालाही अटक करण्यात आले. दोघांवरही भादंवि आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Girl's deal for one lakh, father himself took her to the accused and..., victim expresses grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.