वसतिगृहातील मुलींना होळी खेळण्यास बंदी

By admin | Published: March 13, 2017 12:44 AM2017-03-13T00:44:58+5:302017-03-13T00:44:58+5:30

दिल्ली विद्यापीठाच्या मुलींसाठीच्या दोन वसतिगृहांतील मुलींना होळी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय ‘मनमानी’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

Girls from hostel are not allowed to play Holi | वसतिगृहातील मुलींना होळी खेळण्यास बंदी

वसतिगृहातील मुलींना होळी खेळण्यास बंदी

Next

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या मुलींसाठीच्या दोन वसतिगृहांतील मुलींना होळी खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय ‘मनमानी’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हा निर्णय वसतिगृहात राहणाऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेला आहे, असे दिल्ली विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्टुडंट्स हाऊस फॉर वुमेनने म्हटले. वसतिगृहात राहणाऱ्या आणि महिला अभ्यागतांना १२ मार्चच्या रात्री ९ पासून ते १३ मार्चच्या सायंकाळी सहापर्यंत वसतिगृह परिसरात प्रवेश दिला जाणार नाही की परिसरातून बाहेर जाऊ दिले जाणार नाही. ज्यांना कोणाला होळी खेळायची असेल त्यांनी वसतिगृहाच्या परिसराबाहेर जावे, असे आयएसएचडब्ल्यूने फलकावरील सूचनेत स्पष्ट केले.

Web Title: Girls from hostel are not allowed to play Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.