मुलींना कळाले, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, सर्वाधिक महाविद्यालयांच्या यादीत पुणे टाॅप १० जिल्ह्यांत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:41 AM2024-02-01T06:41:05+5:302024-02-01T06:41:46+5:30
Education News: आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्पा एका पिढीच्या जडणघडणीत फार माेलाची भूमिका पार पाडताे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील उच्च शिक्षणाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.
- मनाेज रमेश जाेशी
नवी दिल्ली - आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्पा एका पिढीच्या जडणघडणीत फार माेलाची भूमिका पार पाडताे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील उच्च शिक्षणाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आठ वर्षांमध्ये ९० लाखांची वाढ झाली आहे. उच्च शिक्षण घेण्यामध्ये मुलींचा सहभाग वाढला असून, सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या देशातील टाॅप १० जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. उच्च शिक्षणावर अखिल भारतीय सर्वेक्षणाच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मुलींना कोणता विषय आवडतो
- विज्ञान शाखेत मुलींची संख्या जास्त आहे. त्यातही पदव्युत्तर शिक्षणात मुलींचे प्रमाण अधिक आहे.
- पदव्युत्तर शिक्षणासाठी समाजविज्ञान शाखेत सर्वाधिक ५६.६% मुलींनी नाेंदणी केली आहे.
- विज्ञान शाखेत ६१.२% मुलींनी प्रवेश घेतला आहे.
- आयटी, संगणक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयांचा नववा आणि दहावा क्रमांक लागताे.