मुली शाळेच्या बॅगेत भलत्याच वस्तू घेऊन जात होत्या; सत्य समोर येताच शिक्षकही गोंधळात पडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:14 AM2021-05-17T11:14:02+5:302021-05-17T11:14:38+5:30

मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी देखील चूक कबूल केली आणि शाळेची माफी मागितली.

The girls were carrying jeans, mobile, t-shirt in their school bags in Haryana; Even the teacher was shocked | मुली शाळेच्या बॅगेत भलत्याच वस्तू घेऊन जात होत्या; सत्य समोर येताच शिक्षकही गोंधळात पडले!

मुली शाळेच्या बॅगेत भलत्याच वस्तू घेऊन जात होत्या; सत्य समोर येताच शिक्षकही गोंधळात पडले!

googlenewsNext

हरयाणातील शहाबादमधील सरकारी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुली पुस्तकं न आणता बॅगेतून मोबाईल, जीन्स, दोन टी-शर्ट शाळेत घेऊन येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षकांकडून मुलींची बॅगेची तापसणी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

सदर प्रकाराची मुख्यधापकांनी चौकशी केली असता, मुली शाळेच्या मधल्या सुट्टीत कपडे बदलून शाळेतून पळून जात आणि सर्ववेळ बाहेर फिरत असल्याचे सांगितले. हा 7 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता जो शाळेतून पळून जावून बाहेर इतरत्र फिरत असायचा. याबाबात स्वत: मुलींनी माहिती दिल्यानंतर शिक्षकही गोंधळात पडले.

हरियाणा स्कूल ऑफिसर युनियनचे अध्यक्ष विनोद कौशिक यांनी सांगितले की, इतर मुलींच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक व दोन महिला शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या बॅगाची तपासणी घेतली होती. सदर प्रकार समोर आल्यानंतर संबंधित मुलींच्या पालकांना मुख्यधापकांनी शाळेत घेऊन येण्यास सांगितले. घरातील सदस्यांनी शाळा प्रशासनाकडे माफी मागितली, अपमानाचे कारण देऊन त्यांनी शाळेला माफ करायला सांगितले.

बॅगेत मोबाइल व कपडे मिळाल्यानंतर त्या मुलींसह त्यांच्या कुटुंबीयांनी देखील चूक कबूल केली आणि शाळेची माफी मागितली. पण काही दिवसानंतर पालकांनी पुन्हा शाळेतील शिक्षकांना धमकावणे सुरू केले. त्यानंतर या शिक्षकांनी पोलिसांत या पालकांची तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षकांनी डीसीकडे देखील दाद मागितली आहे. त्याचबरोबर वि’द्यार्थ्यांच्या बॅगमध्ये मोबाइल आणि जीन्स टीशर्टची चर्चा संपूर्ण शाळेत चर्चेचा विषय होत आहे.

Web Title: The girls were carrying jeans, mobile, t-shirt in their school bags in Haryana; Even the teacher was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.