पहिल्या इयत्तेपासूनच गीता शिकवायला हवी
By admin | Published: August 3, 2014 02:11 AM2014-08-03T02:11:46+5:302014-08-03T02:11:46+5:30
मी देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातच भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेश केला असता, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ अनिलआऱ दवे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
Next
अहमदाबाद : मी देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातच भगवद्गीता आणि महाभारत यांचा समावेश केला असता, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या़ अनिलआऱ दवे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
न्या. दवे म्हणाले की, तथाकथित धर्मनिरपेक्षवादी माङयाशी सहमत होणार नाहीत..यावरून मला कोणी धर्म निरपेक्ष म्हटले वा ना म्हटले तर त्याबद्दल मी दिलगिर आहे.मी भारताचा हुकूमशहा असतो तर पहिल्या वर्गापासून मुलांना गीता आणि महाभारत शिकवले असत़े याच माध्यमातून तुम्ही जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान शिकू शकता. काही चांगले आत्मसात करायचे असेल तर ते कुठूनही मिळाले तरी त्याचा स्वीकार करायला हवा.
‘जागतिकीकरणाच्या युगात समकालीन मुद्दे व मानवाधिकारांची आव्हाने’ या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत न्या़ दवे बोलत होत़े गुजरात लॉ सोसायटीने या परिषदेचे अयोजन केले होत़े
आज अनेक देशात दहशतवाद फोफावला आह़े अनेक देश लोकशाहीवादी आहेत़ लोकशाहीवादी देशातील प्रत्येक जण सुजाण असेल तर साहजिकच ते अशाच नीतिमान व सज्जन व्यक्तींना निवडून देतील़ अशा नीतिमान व सज्जन व्यक्ती कधीच कुणाचे
अहित चिंतू शकल्या नसत्या, असे ते म्हणाले.
अशा प्रकारे प्रत्येकामध्ये जे काही चांगले आहे त्याचे पोषण करून आपण सर्वत्र पसरत असलेला हिंसाचार थांबवू शकू. पण त्यासाठी आपल्याला पुन्हा आपल्या भूतकाळात जाऊन मार्ग शोधावे लागतील, असे त्यांचे प्रतिपादन होते. याच परिषदेत बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा म्हणाले की, ‘सर्वासाठी विकास’ हा जागतिकीरणामागचा मूळ गाभा असायला हवा. जागतिकीकरणाचे लाभ आपण सर्वार्पयत पोहोचवू शकलो नाही तर त्यातून भविष्यात मोठी आव्हाने उभी राहतील, असे त्यांचे म्हणणो होते. (वृत्तसंस्था)
च्भारताने आपल्या प्राचीन परंपरा, संस्कृती आणि सभ्यतेकडे परतायला हवे आणि यासाठी लहान वयात मुलांना महाभारत, भगवद्गीता शिकावयाला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी मांडल़े
च्यावेळी ते म्हणाले की, गुरू-शिष्य परंपरेसारख्या आपल्या अनेक महान परंपरा कालौघात नष्ट झाल्या आहेत़ या परंपरा जपल्या गेल्या असत्या तर देशात हिंसाचार, दहशतवादासारख्या समस्या दिसल्या नसत्या़