नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 02:25 AM2019-10-12T02:25:26+5:302019-10-12T02:25:49+5:30

अनुसूचित जातीच्या व अतिमागास घटकातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये व ११ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा विचार आहे.

Give 33% reservation to women in jobs; Election Manifesto | नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा

नोकऱ्यांत महिलांना ३३% आरक्षण देणार; निवडणूक जाहीरनामा

googlenewsNext

चंदीगड : हरयाणामध्ये २१ आॅक्टोबर रोजी होणाºया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारी आपला ‘संकल्पपत्र' हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सरकारी नोकºया व खासगी संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के राखीव जागा ठेवण्याचे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
या जाहिरनाम्यात म्हटले आहे की, हरयाणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून महिलांना मोफत प्रवासाची सुविधा तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये महिलांना ५० टक्के राखीव जागा ठेवण्यात येतील. महिला कल्याणावर काँग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये भर देण्यात आला असल्याचे या पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. हरयाणा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कुमारी सेलजा यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी दिली जाईल. अनुसूचित जातीच्या व अतिमागास घटकातील पहिली ते दहावी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १२ हजार रुपये व ११ वी ते १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा विचार आहे.

भाजप सरकारच्या घोटाळ्यांची चौकशी
कुमारी सेलजा म्हणाल्या की, हरयाणामध्ये भाजप सरकारच्या कारकिर्दीत जे घोटाळे झाले त्यांच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमण्यात येईल. राज्यातील अनेकांना अमली पदार्थांच्या व्यसनाने विळखा घातला आहे.
या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याचा विचार आहे. या जाहीरनाम्याच्या प्रकाशनप्रसंगी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते भूपिंदरसिंग हुडा, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष किरण चौधरी, माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आदी ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.

Web Title: Give 33% reservation to women in jobs; Election Manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.