Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 02:53 PM2019-02-15T14:53:49+5:302019-02-15T14:59:01+5:30

पुलवामातील हल्ल्याचा उद्धव ठाकरेंकडून तीव्र शब्दांमध्ये निषेध

give befitting reply to pakistan says shiv sena chief uddhav thackeray after pulwama attack | Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

Pulwama Attack: 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

मुंबई: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. पाकिस्तानला सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. प्रत्यक्ष कारवाई करा. 'सर्जिकल स्ट्राइक'च्याही पुढे जाऊन पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दहशतवादी हल्ल्याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. 

काश्मीरमधील पुलवामातील अवंतीपुराध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर काल हल्ला झाला. यामध्ये 37 जवान शहीद झाले. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली. आता हल्लेखोरांना सोडणार नाही, असं नुसतंच बोलू नका. निवडणुकांचा प्रचार जाऊ द्या, पाकिस्तानचा सोक्षमोक्ष लावा, अशी मागणी उद्धव यांनी केली. 

2016 मध्ये भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. याचा संदर्भ देत उद्धव यांनी त्यापेक्षाही कठोर कारवाईची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आला होता. तो भारताचाच भाग आहे. मात्र आता त्यापेक्षा पुढे जाण्याची गरज असल्याचं उद्धव म्हणाले. 

सध्या सरकारकडून देशातील जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र पूर्ण देश शांतच आहे. शांत राहण्याशिवाय देशातील जनता काय करु शकते. पण तुम्ही का शांत आहात?, असा सवाल उद्धव यांनी सरकारला विचारला. पाकिस्तानात घुसा आणि मोठी कारवाई करा. संपूर्ण देश सरकारच्या मागे आहे. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवायची हीच वेळ आहे, असंदेखील त्यांनी म्हटलं. 

काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: give befitting reply to pakistan says shiv sena chief uddhav thackeray after pulwama attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.