फिल्ड मार्शल करिअप्पा यांना भारतरत्न द्या - लष्करप्रमुख बिपीन रावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 06:36 AM2017-11-05T06:36:26+5:302017-11-05T06:37:52+5:30
स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल कोंडदेरा मडप्पा (के. एम.) करिअप्पा यांची भारतरत्नसाठी शिफारस करण्याची ही वेळ आहे, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या भारतरत्नचे समर्थन केले आहे.
कोडगू (कर्नाटक) : स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्ड मार्शल कोंडदेरा मडप्पा (के. एम.) करिअप्पा यांची भारतरत्नसाठी शिफारस करण्याची ही वेळ आहे, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी त्यांच्या भारतरत्नचे समर्थन केले आहे.
करिअप्पा यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते म्हणाले की, जर अन्य व्यक्तींना हा पुरस्कार मिळत असेल तर, तो करिअप्पा यांना तर मिळायलाच हवा. फिल्ड मार्शल करिअप्पा यांनी १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. फाइव्ह स्टार रँक मिळविणारे ते भारतीय सैन्यातील प्रमुख दोन सैन्य अधिका-यामधील एक अधिकारी होते. त्यांची १९४९ मध्ये कमांडर- इन -चीफ म्हणून नियुक्ती झाली होती. (वृत्तसंस्था)