निदान पुढच्या वर्षीतरी 'संन्याशाला भारतरत्न' द्या, रामदेव बाबांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 10:07 AM2019-01-27T10:07:25+5:302019-01-27T10:08:19+5:30

भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये प्रणब मुखर्जी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Give Bharat Ratna to Saint in the next year, Ramdev Baba's demand | निदान पुढच्या वर्षीतरी 'संन्याशाला भारतरत्न' द्या, रामदेव बाबांची मागणी

निदान पुढच्या वर्षीतरी 'संन्याशाला भारतरत्न' द्या, रामदेव बाबांची मागणी

Next

नवी दिल्ली - योगगुरू रामदेव बाबा यांनी भारतरत्न पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर काहीही नाराजी व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत, महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद किंवा शिवकुमार स्वामीजी यांना पुरस्कार मिळायला हवा होता. मात्र, गेल्या 70 वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न देण्यात आला नाही, दे दुर्भाग्य असल्याचं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलंय. तसेच पुढच्यावर्षी तरी एखाद्या सन्याशाला भारतरत्न द्या, अशी मागणीही बाबा रामदेव यांनी केलीय. 

भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये प्रणब मुखर्जी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांनाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर, बाबा रामदेव यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे अभिनंदन केले. तसेच भारत सरकारचेही आभार मानले. मात्र, आत्तापर्यंत एकाही संन्याशाला भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. गेल्या 70 वर्षात एकाही संन्याशाला भारतरत्न न देणे, हे दुर्दैवी असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं. तसेच, निदान पुढच्यावर्षी तरी एखाद्या सन्याशाला भारतरत्न द्या, अशी आग्रही मागणी बाबा रामदेव यांनी केली. तसेच 2019 मधील निवडणुकीत काट्याची टक्कर होऊ शकते. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका. देशाला शैक्षणिक, आर्थिक, चिकित्सक आणि अन्य गुलामगिरीतून स्वतंत्र मिळावा यासाठी संकल्प करा, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी राष्ट्रपती भवनातून करण्यात आली. 



 

Web Title: Give Bharat Ratna to Saint in the next year, Ramdev Baba's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.