स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या - शिवसेना
By admin | Published: September 14, 2015 07:33 PM2015-09-14T19:33:23+5:302015-09-14T19:33:23+5:30
ब्रिटिशांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग व योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - ब्रिटिशांनी दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग व योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रामध्ये राऊत यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतीकारकांनी केलेल्या अजोड कार्याचा उल्लेख करत या क्रांतीकारकांचा शिरोमणी म्हणून सावरकरांचं नाव कायम घेतलं जाईल असं म्हटलं आहे. दोन वेळा जन्मठेप झाली, अंदमानला काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवून अनन्वित हाल केले, परंतु स्वातंत्र्यदेवतेचा घोष करणा-या सावरकरांचं धैर्य अबाधित राहिल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
सावरकर हिंदू राष्ट्राचे समर्थक होते, म्हणून त्याचा बदला घेत आधीच्या सरकारांनी सावरकरांचा जाणुनबुजून बदला घेतल्याचा आरोप करताना तुम्ही ही चूक सुधारा आणि त्यांना भारतरत्न घोषित करा तसेच हा समारंभ अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये साजरा करा असे आवाहनही राऊत यांनी केले आहे.