'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:57 IST2024-12-25T16:57:14+5:302024-12-25T16:57:42+5:30
'नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होणार.'

'नितीश कुमार आणि नवीन पटनायक यांना भारतरत्न द्या', भाजप खासदाराची मागणी
Bharatratna :बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयू पक्षाचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) आणि ओरिसाचे माजी मुख्यमंत्री आणि बीजेडी पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी होत आहे. ही मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बेगुसराय मतदारसंघाचे खासदार गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांनी केली आहे.
#WATCH | Begusarai, Bihar: Union Minister Giriraj Singh says, "..Today's children have not seen Lalu's jungle raj. Nitish Kumar has worked for the development of the state. Naveen Patnaik has also served Odisha for years. Such people should be honoured with awards like Bharat… pic.twitter.com/M69Ut1mBfG
— ANI (@ANI) December 25, 2024
नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार
भाजप खासदार गिरिराज सिंह म्हणाले की, 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल. कोणीही संभ्रमात राहू नये. लालू प्रसाद यादव सर्वतोपरी प्रयत्न करतील, पण बिहार विधानसभेच्या निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील आणि बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार
यापूर्वी पक्ष जनता दल (युनायटेड) ने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. जेडीयूचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह आणि पक्षाचे कार्याध्यक्ष संजय झा यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष एनडीएच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि तसाच राहील. दरम्यान, भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीदेखील म्हटले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील वर्षी बिहार विधानसभा निवडणूक लढवेल. 2025 च्या अखेरीस बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी निवडणूक होणार आहे.