आशीर्वाद असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती मतदारांना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 08:23 PM2017-12-12T20:23:34+5:302017-12-12T20:26:21+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले.

Give blessings, Prime Minister Narendra Modi's Gujarati voters emotionally | आशीर्वाद असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती मतदारांना भावनिक साद

आशीर्वाद असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती मतदारांना भावनिक साद

googlenewsNext

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारांना भावनिक साद घालताना म्हणाले, " 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये रेकॉर्डब्रेक मतदान करा, असे आवाहन मी मी गुजरातमधील बंधू भगिनींना करतो. मी आवाहन करतो की, तुम्ही भारतीय जनता पक्षाला बंपर बहुमत देऊन प्रत्येक बुथवर पक्षाला विजय मिळवून द्या."




या ट्विटमधून काँग्रेसवर टीका करण्याची संधीही मोदींनी सोडली नाही. त्यांनी काँग्रेसने खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. आमच्या विरोधी पक्षाने गुजरात, गुजरातचा विकास आणि वैयक्तिक स्तरावर माझ्याविरोधात खोट्या माहितीचा प्रसार केला. अशा प्रकारांची मी कल्पनादेखील केली नव्हती. निश्चितपणे या प्रकारामुळे प्रत्येक गुजराती माणसाला दु:ख झाले आहे. गुजरातमधील जनता निश्चितपणे याला चोख उत्तर देतील. प्रचारादरम्यान मी गुजरातमधील बऱ्याच ठिकाणी फिरलो. यादरम्यान, गुजराती समाजाकडून ज्याप्रकारचं प्रेम गेल्या दोन महिन्यांत मिळाले तसे माझ्या सामाजिक जीवनातील गेल्या 40 वर्षांत मिळालेले नाही. या प्रेमामुळे मला देशाच्या विकासाप्रति आपल्या जीवनाला समर्पित करण्याचे आणि धैर्य आणि प्रोत्साहन मिळाले आहे.  






  विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 93 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून, मतमोजणी 18  डिसेंबरला होणार आहे. 

गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, राज्यात दीर्घकाळानंतर सत्तेत पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसने कसलेली कंबर आणि पटेलांची नाराजी इव्हीएम मशीनमधून व्यक्त होण्यासाठी हार्दिक पटेल यांनी लावलेला जोर यामुळे गुजरात विधानसभेचा प्रचार बऱाचा गाजला. आता हा गुजराती मतदार दुसऱ्या टप्प्यात कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो आणि गुजरातमध्ये कुणाचे सरकार बनवतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.   

Web Title: Give blessings, Prime Minister Narendra Modi's Gujarati voters emotionally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.